शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवरील खड्डे अद्यापही दुर्लक्षितच !
शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे बुजविण्याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. वणी वरोरा रोडवरील आशीर्वाद बार व लोकमान्य टिळक महाविद्यालया जवळ रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले असून संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी खड्डे न बुजविण्याची प्रतिज्ञाच केली असल्याचे पाहायला मिळत आहे. कित्येक दिवसांपासून वणी वरोरा या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेहमी या रस्त्याने जाणे येणे करीत असतांनाही त्यांच्या दृष्टीस हे खड्डे पडू नये याचेच नवल वाटते. सदर खड्डे रहदारीला अडथळे निर्माण करण्याबरोबरच अपघातासही आमंत्रण देत आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन रोडवर पडले आहेत. सुदैवाने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. एखाद्याच्या जीवावर बितल्यानंतरच संबंधित विभाग खड्डे बुजविण्याचा मुहूर्त काढतो कि काय असे वाटू लागले आहे. या रस्त्याने जाणारा प्रत्येक वाहन धारक खड्डे चुकविताना संबंधित विभागाला कोसतांना दिसतो आहे.
शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असतांनाही संबंधित विभाग खड्डे बुजविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरील आशीर्वाद बार व लोकमान्य टिळक कॉलेज समोर रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रास्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. शहरातील एकमेव मुख्य कॉलेज या रस्त्यावर असून विद्यर्थ्यांचे या रस्त्याने नेहमी येणे जाणे असते. मंदिरे व मंगलकार्यालयेही या रस्त्यावरच असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. बहुतांश वस्त्यांमधील नागरिक याच रस्त्याने बाजारपेठेत जाणे येणे करतात. तेंव्हा रस्त्यावरील खड्डे चुकवितांना वाहने अनियंत्रित होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात संतुलन बिघडून दुचाकीस्वार रोडवर पडणे आता नेहमीचेच झाले आहे. कित्येक दिवसांपासून शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पण संबंधित विभागाने खड्डे न बुजविण्याचा निर्धारच केला असल्याचे पाहायला मिळत आहे. खड्डे चुकवितांना एखादी मोठी दुर्घटना झाल्यास संबंधित विभागस त्यास जबाबदार राहील अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.