WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोबाईलवर चॅटिंग वरून अल्पवयीन मुलाला फायटरने मारहाण

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शाळेतील मैत्रिणी सोबत मोबाईलवर संभाषण व चॅटींग करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मुलीच्या भावाने मित्रासह रस्त्यात गाठून फायटर व लाकडी दांड्यानी बेदम मारहाण करून जख्मी केल्याची घटना २३ जानेवारीला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. मुलाने आईसह पोलीस स्टेशनला येऊन मारहाणीची तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वणी पब्लिक स्कुलमध्ये नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची त्याच शाळेतील मुलीसोबत मैत्री होती. दोघेही एकमेकांसोबत मोबाईलवर चॅटिंग करायचे. त्यांचे मोबाईलवर सुरु असलेले चॅटिंग मुलीच्या भावाच्या निदर्शनास आल्याने त्याने अल्पवयीन मुलाला टिळक चौकातील चाय टपरी जवळ गाठून माझ्या बहिणीसोबत मोबाईलवर चॅटिंग करतो, असे म्हणत आपल्या मित्रासह त्याला फायटर व लाकडी दांड्याने फिल्मीस्टाईल मारहाण केली.

वणी पब्लिक स्कुल मध्ये नवव्या वर्गात शिकणाऱ्या अभिषेक दिपक गढवाल (१५) रा. साईमंदिरमागे याची शाळेतीलच मुलीसोबत मैत्री होती. दोघेही एकमेकांसोबत मोबाईलवर बोलायचे. तसेच त्यांच्यात मोबाईलवर चॅटिंगही सुरु असायची. ही बाब मुलीच्या भावाच्या लक्षात आल्याने त्याने अभिषेक याला माझ्या बहिणीपासून दूर रहा म्हणत मित्रांसह बेदम मारहाण केली. याआधी २१ जानेवारीलाही मुलीच्या भावाने अभिषेक याला पेट्रोलपंप जवळ गाठत मारहाण केली होती. त्यावेळी आपसी समेट घडवून आणल्याने प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत आले नाही. परंतु २३ जानेवारीला परत मुलीच्या भावाने अभिषेकवर फायटरने हल्ला करून जख्मी केल्याने अखेर अभिषेक गढवाल याने आपल्या आईसह पोलीस स्टेशनमध्ये येऊन मारहाणीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी रितिक नरेश चवरे (२०) रा. सेवानगर, ललित सुभाष परचाके (२१) रा. रंगारीपुरा, अनुवर्ष उर्फ चिकू अनिल सातपुते (२३) रा. छोरीया नगर, अभिषेक विनोद ताराचंद (२०) रा. सेवानगर या चारही तरुणांवर भादंवि च्या कलम ३२४,५०६,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईल व इंटरनेटच्या या युगात कमी वयात सज्ञानी झालेल्या मुलामुलींमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होऊन मोबाईलवर तासनतास चॅटिंग सुरु असतात. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे ऑनलाईन क्लासेस करिता मुलामुलींना मोबाईल उपलब्ध करून द्यावे लागले. या मोबाईलचा मुले व्हाट्सअप, फेसबुक वरील चॅटिंग करिताही वापर करू लागले आहेत. कमी वयात मैत्री करून तासनतास मोबाईलवर चॅटिंग करणारी अल्पवयीन पिढी शैक्षणिक जीवनाचा ऱ्हास करतांना दिसत आहे. शाळेतील मैत्रिणी सोबत चॅटिंग करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मुलीच्या भावाने बहिणीचा नाद सोड म्हणत मित्रासह फिल्मी स्टाईल मारहाण केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share