WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत बालकांना दिले जात आहे पोलिओचे डोज !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून त्यांना पोलिओच्या आजारापासून दूर ठेवण्याच्या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत आज ३१ जानेवारीला संपूर्ण राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत वणी तालुक्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ९ हजार ३८१ बालकांना पोलिओचे डोज पाजण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे ठिकठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात आले आहे. तसेच बुथवर न येऊ शकणाऱ्या बालकांना पोलिओचे डोज देण्याकरिता आरोग्य विभागाने मोबाईल टिम तयार केली असून आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पर्यवेक्षक पुढील तीन ते चार दिवस शहर व गावखेड्यातील वस्त्यांमध्ये जाऊन ५ वर्ष वयोगटातील बालकांनाचे सर्वेक्षण करून त्यांना पोलिओचे डोज पाजणार आहेत. तालुका आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाची संपूर्ण तयारी केली असून जास्तीतजास्त बालकांना पोलिओचे डोज देता यावे याकरिता आरोग्य यंत्रणा सतर्कतेने कमी लागली आहे.

प्रवासी कुटुंबातील बालकांना पोलिओचे डोज घेता यावे याकरिता बसस्थानक परिसरात पोलिओ बूथ उभारण्यात आले आहे. याठिकणी ट्रान्झिट पथक लसीकरणाची जबाबदारी पार पाडत असून स्टाफ नर्स श्रीमती इंगोले यांच्यासह आरोग्य सेविका बसस्थानकात येणाऱ्या ५ वर्षापर्यंतच्या प्रवासातील बालकांना पोलिओचे डोज पाजत आहेत. पालकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगत बालकांना पोलिओचे डोज देण्याकरिता आरोग्यसेविका विशेष परिश्रम घेतांना दिसून येत होत्या.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share