शिंदोला येथील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले
तालुक्यातील शिंदोला येथे काही वर्षाआधी बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे करण्यात आले आहे. प्रवेशद्वार निर्माण झाल्यापासून प्रवेशद्वाराला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु काही लोकांचा या नामकरणाला विरोध असल्याने नामकरण प्रक्रिया रखडली होती. परंतु ग्रामपंचायतेने नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत प्रवेशद्वाराला शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे ठरविले. २९ जानेवारीला ग्रामपंचायतेने ग्रामसभेत ठराव पारित करून शिंदोला गावात काही वर्षाआधी बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतेच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन पाच वर्षांपासून रखडलेली नामकरण प्रक्रिया पूर्ण केली. प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून गावकऱ्यांनी प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी रेटून धरली होती. ग्रामपंचायतेने प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन पाच वर्षांपासून सुरु असलेला नामकरणाचा तिढा सोडविला आहे.