WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अखेर दुचाकी चोरट्याला पोलिसांनी केली अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातील दिपक चौपाटी परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लावून डीबी पथकाने दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. १६ जानेवारीला दिपक चौपाटी परिसरातून उभी असलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. तेंव्हा पासून पोलीस दुचाकी चोरट्याचा शोध घेत होते. २४ फेब्रुवारीला शास्त्रीनगर येथील व्यक्तीकडे चोरीला गेलेली दुचाकी आढळल्याची माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने शास्त्रीनगर येथील त्या दुचाकी चोरट्याचे घर गाठत त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले.

१६ जानेवारीला दिपक चौपाटी परिसरात उभी असलेली होंडा लिव्हो कंपनीची MH ३५ AN २०४२ ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यापासून डीबी पथक दुचाकी चोरट्याचा शोध घेत होते. परंतु चोरटा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात नेहमी तत्पर राहिलेल्या डीबी पथकाने अखेर दुचाकी चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. अंकुश ईश्वर देठे (२३) रा. शास्त्रीनगर असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर कार्यवाही ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, दिपक वान्ड्रूसवार, पंकज उंबरकर यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share