WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी वरोरा मार्गावरील खड्डे आद्यपही दुर्लक्षितच

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा या मुख्य रस्त्यावरील खड्डे अद्यापही दुर्लक्षितच असून खड्डे बुजविण्याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरील खड्डे न बुजविण्याचा संबंधित विभागाने एक प्रकारे निर्धारच केला असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर असलेल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर कित्येक महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा अपघातास आमंत्रण देत असून हा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन पडले आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारीही नेहमी या रस्त्याने जाणे येणे करतात पण त्यांच्या दृष्टीस हा खड्डा पडू नये याचेच नवल वाटते. वाहतुकीला अडथळे निर्माण करणारा व अपघाताचे कारण बनू पाहणारा हा खड्डा बुजविण्याची जराही तसदी घेतल्या जात नसून संबंधित विभाग आंधळेपणाचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून ते अद्यापही पूर्णपणे बुजविण्यात आलेले नाहीत. या रस्त्यावरील आशीर्वाद बार जवळील मोठा खड्डा नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर नुकताच बुजविण्यात आला. पण लोकमान्य टिळक कॉलेज समोरील मोठा खड्डा अनेक तक्रारीनंतरही दुर्लक्षित असून हा खड्डा बुजविण्याचे सौजन्य अद्यापही संबंधित विभागाने दाखविलेले नाही. हा खड्डा चुकवितांना कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रत होऊन पडले आहेत. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे नेहमी या रस्त्याने जाणे येणे असते. या रस्त्यावर अनेक फंक्शन हॉल व लॉन असून बहुतांश परिसरातील नागरिकांचा बाजारपेठेत जाण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. वाहतुकीचाही हा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. अशा या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून संबंधित विभाग खड्डे बुजविण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असून किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. कित्येक दिवसांपासून या रस्त्यावरिल खड्डे बुजविण्याची ओरड होत असतांना संबंधित विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा कधी कुणाच्या जीवावर बितेल याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे दुर्घटनेची वाट न बघता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share