WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतबंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरातील व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

जाचक वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली विरोधात देशातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या भारतबंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दर्शविला. बोटावर मोजण्याइतकी किरकोळ दुकाने वगळता संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. देशातील व्यापाऱ्यांच्या हाकेवर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानांचे टाळे न उघडता पूर्णतः बंद पाळला.

जीएसटी, ई-वे बिल व इंधनवाढीच्या विरोधात देशातील व्यापाऱ्यांनी भारतबंदची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन भारतबंदला पाठिंबा दर्शविला. शहरातील दुकानांचे सकाळपासून आज कुलुपच उघडले नाही. प्रत्येक व्यापाऱ्याने बंदमध्ये सहभाग दर्शवून बंद पूर्णतः यशस्वी केला. किरकोळ दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ आज पूर्णतः बंद राहिल्याने शहरातील रस्ते ओसाड पडले होते. शहरात जिकडे तिकडे सामसूम दिसत होती. व्यापारी व कर व्यवसायिकांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग दर्शविला. जीएसटी विरोधात देशातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या भारतबंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share