WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत संस्कार भारती ने केला गीतरामायण महायज्ञा ....

ImageImage

सागर मुने, वणी :- विदर्भात 151 गीतरामायनाचा कार्यक्रम संस्कार भारती समिती तर्फे आयोजित करण्यात आले होते. त्यातीलच एक पुष्प वणी समिती तर्फे जैताई देवस्थान येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेना शहर अध्यक्ष राजू तुराणकर, जैताई देवस्थानचे सचिव माधवराव सरपटवार, संस्कार भारती समिती अध्यक्ष रजनी पोयाम, प्राध्यापक स्वानंद पुंड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र वाल्मिकी ग.दि.माडगूळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी संपूर्ण रामायण 56 गीता मध्ये रचले व त्यातील निवडक 16 गीत नृत्यासह गीतरामायण वणी येथे भव्य प्रमाणात बऱ्याच वर्षांनंतर सादर झाले, असे रसिकांनी म्हटले. स्वये श्रीराम प्रभू या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अरुण दिवे यांनी हार्मोनियम वर उत्कृष्ट साथ करून त्रिवार जयजयकार गीताने सांगता केली. प्रणिता पुंड, अमृता अलोणे, सुप्रिया केदार, रेणुका अणे, अनुराधा वैद्य, अरुणा उत्तरवार, सुरेश वैद्य, बालकलावंत गौरांग सरमोकदम यांनी गायन केले. गीतरामायणाचे निवेदन सागर मुने व रुपाली सालकाडे या दोघांनी आपल्या वाणीतून रामायण डोळ्यासमोर घडत असल्याचा भास श्रोत्यांना जाणवत होता. तसेच रुपाली ने राम जन्मला व सागर ने स्वयंवर झाले सीतेचे, पेटवी लंका हनुमंत या गीताने रामभक्त मंत्रमुग्ध झाले. तबल्यावर अभिलाष राजूरकर, सिंथेसायझेर अजित खंदारे, सहताल वाद्य अक्षय करसे,अतुल डफ यांनी केले.

या गीत रामायणात 50 कलावंतांनी नृत्य सादर करून रामायणातील पात्रांची छवी दाखवली. विकास घाटोळे व आकाश बोथले यांनी नृत्याचे दिगदर्शन केले होते.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर, केबीसी कॅटरिंगचे संचालक कैलास बोबडे,ऍड. निलेश चौधरी, ड्रीम प्ले स्कूल, उत्तरवार मोटर्स, कृष्णा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांनी विशेष सहकार्य केले.

संस्कार भारती समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम च्या यशवी ते साठी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share