WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

फळ-भाजीपाला विक्री ते प्रसिद्ध गृहनिर्माण उद्योजक - संजयभाऊ निमकर

Image

"अभिष्टचिंतन निमित्त घेतलेला खास आढावा"

उद्योगाच्या क्षेत्रामध्ये वणीकरांचे भूषण ठरलेल्या आणि यवतमाळ जिल्ह्यात गृहनिर्माण उद्योगामध्ये अग्रस्थानी असलेल्या ओम बिल्डर अँड डेव्हलपर्स समूहाचे संस्थापक संजयभाऊ निमकर यांचा आज 'वाढदिवस' ते आज ४८ व्या वर्षामध्ये पदार्पण झाले आहे. गृहनिर्माण उद्योग क्षेत्रात ज्या ज्या वणीकरांनी उतुंग भरारी घेतली त्यामध्ये संजय निमकरांनी सुरु केलेल्या 'ओम बिल्डर अँड डेव्हलपर्स' गृहनिर्माण उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. १२ जून १९७३ जन्मलेल्या संजय निमकरांनी सुरुवातीचा काही काळ त्यांनी शाळा शिकत असतानांच बस स्टॅण्ड वर जांभूळ, पेरू व पपई विकायला सुरुवात केली. तसेच श्याम टॉकीज समोर पापड ही विकायचे. याकाळात त्यांचे वडील भाजी मंडी मार्केट ला बैलगाडी चालवत असायचे. मात्र, त्यांचा अधिक कल व्यवसायातच होता. पूर्व परिस्थितीने त्यांच्यात उत्कृष्ट उद्योजक होण्याची पात्रता निर्माण होत होती. दिवसामागे दिवस जात होती आणि एक दिवस त्यांची पत्नी सौ. निमकर ह्या संजय यांना म्हणाल्या सगळ्याकडे स्वतः चे प्लॉट आहे. मग आपला ही एखादा प्लॉट असावा. अशी इच्छा संजय निमकर यांचेकडे व्यक्त केली. फार विचार न करता,पत्नीचा शब्द पाळत त्यांनी शहराला लागलेल्या दामले फैल येथील एक प्लॉट खरेदी केला. आणि तोच प्लॉट निमकर यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. जवळजवळ सहा महिन्यानंतर संजय निमकर यांनी पत्नीच्या शब्दाला मान देत घेतलेला प्लॉट दीड पट दराने पुढे तो विकला गेला. असे करीत करीत शेत विकत घेतले व त्यात ले आऊट पाडले. स्वतः च्या पायावर उभे राहून उद्योग सुरु करावा या ध्येयाने प्रेरित होऊन युवा उद्योजक संजय निमकरांनी २००१ मध्ये ओम बिल्डर गृहनिर्माणांची मुहूर्तवेढ रोवली. त्याअंतर्गत वणी, मारेगाव व झरी भागात त्यांनी गृह बांधकाम सुरु केले. घराची डिजाईन आणि गुणवत्ता त्यांनी नेहमीच जोपसली. त्यामुळेच ओम बिल्डर अँड डेव्हलपर्स नाव वणीतच नाही तर तालुक्यासह जिल्ह्यात लोकप्रिय ठरले आणि आजही लोकप्रियता कायम आहे. आज त्यांचा "४७ वा वाढदिवस" अभिष्टचिंतन! यानिमित्ताने उद्योग आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वर्षाव होत आहे. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा!

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share