ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांचा संक्षिप्त जीवनपट .....

ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांचा जन्म मुर्धोनी (वणी) येथे एका
शेतकरी कुटुंबात झाला. वणी येथील बाल विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण झाले त्यानंतर पाचवीमध्ये असताना सैनिक स्कुल सातारा (केंद्र सरकार) येथे त्यांची (सहाव्या वर्गात असतांना) महाराष्टातून निवड झाली.
सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सैनिक स्कुल सातारा येथे पूर्ण झाल्यानंतर त्यांची N.D.A. खडकवासला (National Defense Academy), पुणे येथे निवड झाली. N.D.A. येथे चार वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची २०१० मध्ये भारतीय सैन्यामध्ये (Indian Army ) लेफ्टनंट पदावर निवड झाली.
त्यांची प्रथम नियुक्ती गुजरात येथील धागंधारा येथे झाली, त्यानंतर त्यांनी पठाणकोट , लडाख , जम्मू काश्मीर, वेलिंग्टन, नाशिक, डेहरादुन इत्यादी ठीकाणी देश सेवा दिली. त्यानंतर अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर कार्यरत असताना वीरगती प्राप्त झाली.
जन्म दि. १८/०८/१९८७
वीरगती दि. ०४/१०/२०२२
त्यांच्या पश्च्यात आई, वडील,पत्नी ४ वर्षाचा मुलगा, भाऊ व समस्त आवारी परिवार , मोठा मित्र परिवार व गावकरी बंधू आहेत.