WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबूक्की ....

Image

श्रमिक पत्रकार संघटनेकडून घटनेचा निषेध

अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन

दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी

सुरज चाटे वणी - यवतमाळ जिल्हा पोलीस कर्मचाºयांकडून पत्रकारास धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना काल मंगळवारी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ घडली. या घटनेची शहर पोलीस स्टेशनला आज तक्रार देण्यात आली. शिवाय श्रमिक पत्रकार संघटनेच्यावतीने घटनेचा निषेध नोंदवून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन अपर पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. गतकाही दिवसांपासून पत्रकारांवर पोलिसांकडून हल्ले करण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याने रोष व्यक्त होत आहे.

दै. ‘पुण्य नगरी’यवतमाळ जिल्हा कार्यालयातील उपसंपादक पवन लताड काल ७ मे २०१९ रोजी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास वृत्तसंकलनाच्यादृष्टीने बाहेर पडले होते. दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ वादावादी व गोंधळ दिसल्याने ते घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान वाहतूक पोलीस शिपाई भास्कर दरणे यांना काही महिला व पुरूष प्रवासी शिवीगाळ करताना दिसले. त्यामुळे दिसलेला गोंधळ पाहून पवन लताड त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी लोकांची गर्दी सुद्घा जमली होती. याचवेळी टोळी विरोधी पथकातील ऋषी ठाकूर, योगेश गटलेवार व अन्य काही कर्मचारी हजर झाले. त्यांच्याकडून नागरीकांना दमदाटी सुरू होती. तसेच सदर प्रवाशांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी घडत असलेल्या घटनेचे वृत्त प्रतिनिधी म्हणून छायाचित्रण पवन लताड यांनी केले. त्यावेळी ऋषी ठाकूर यांनी त्यांची पाठीमागून कॉलर पकडत धक्काबूक्की केली. तसेच त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तर अर्वाच्य भाषेत बोलून मोबाईलमधील फोटो डिलीट केले. यावेळी त्यांनी दै. ‘पुण्य नगरी’वर्तमानपत्रात काम करीत असल्याची जाणीवही संबंधित पोलिसांना करून दिली. त्या उपरही त्यांनी लताड यांना अश्लील शिवीगाळ चालूच ठेवली. एकूणच पोलिसांकडून सातत्याने माध्यमात काम करणाºया प्रतिनिधींची दडपशाही केली जात आहे. यापूर्वी झरी तालुक्यात सुशील ओझा, वणीत झी २४ तासचे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राउत यांचेवरही पोलिसांनी हल्ला चढविला होता. पोलिसांना सर्वसामान्य नागरीकांचे संरक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आहे. पोलीसच जर कायदा हातात घेउन शांतताप्रिय नागरीक व माध्यमांच्या प्रतिनिधींशी गैरवर्तन करत असेल तर हा लोकशाहीला मोठा धोका आहे. शहरात मोटर वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून, काही पोलीस कर्मचाºयांचीच वाहने रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. बसस्थानकापासून दोनशे मीटरच्या अंतरातच मोठ्या प्रमाणात खासगी वाहने प्रवासी भरुन नेत असल्याचे वास्तव आहे. यामुळे भविष्यात भिषण अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही वर्तमानपत्रात काम करणाºया पवन लताड यांना धक्काबूक्की करून पोलिसांनी जबरीने मोबाईल हिसकावून घेत फोटो डिलीट केले आहे. एकूणच घटनेतील कलम १९ (२) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नागरीक व माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या हक्काची पायमल्ली पोलिसांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. यास्तव संबंधित पोलीस कर्मचारी भास्कर दरणे, ऋषी ठाकूर, योगेश गटलेवारसह उपस्थित कर्मचाºयांवर सेवाशिस्त वर्तणूक कायद्यासह धक्काबूक्की करणे, अश्लील शिवीगाळ करणे, मोबाईल हिसकणे, अपमानास्पद वागणूक देणे अशा गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी दोषींवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्रमीकचे अध्यक्ष नितीन भागवते, सचिव अमोल शिंदे, अनिरुद्घ पांडे, संदीप खडेकर, राजकुमार भितकर, नितीन पखाले, नागेश गोरख, गणेश राउत, केशव सवळकर, विरेंद्र चौबे, सुरेंद्र राउत, प्रवीण देशमूख, श्रीकांत राउत, कपील श्यामकुवर, अमोल ढोणे, राहूल वासनिक, रवी राउत, चेतन देशमूख, समिर मगरे, उज्वल सोनटक्के, अतूल विडूळकर, गणेश खडसे, विवेक गावंडे, उल्हास निनावे दिपक शास्त्री, मयूर वानखडे, मयूर शर्मा, सैय्यद मतिन, अमित कांबळे आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share