WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शुल्लक कारणावरून दोन गटात जुंपली....

Image

पोलिसात तक्रार दाखल :- बसस्थानकातील पोलीस चौकी झाली शोभेची वस्तू....

सुरज चाटे - वणी शहर हे मोठ्या वर्दळीचे शहर म्हणून परिसरात ओळखल्या जाते, परिसरात तसेच आदी ठीक ठिकाणी जावयाचे म्हटल्यास बस स्थानाकावरून बस पकडून आपला समोरचा पल्ला पार करावा लागतो त्याकरिता मिडेल ती बस पकडून प्रवासी आपला प्रवास करीत असतात असे असताना बस मध्ये मधी सुटे पैसे मिळते तर कधी मिळत नसून दिनांक 20 ला चिल्लर च्या वादातून चांगलीच जुंपली असल्याचे दिसून आले असून अखेर सदर बाब पोलीस स्टेशन पर्यंत येऊन पोहोचली, बसस्थानकात दिवसेंदिवस चोरी,पाकिटमार,दारु सप्लाई,चिडीमार व चालक वाहकास मारहान सारख्या घटना वाढत असल्यामुळे बंद असलेली पोलीस चौकी शोभेची वस्तू झाली असून सदर चौकी सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे

दि.20 मे रोजी घडली.वणी बसस्थानकावर चिल्लर च्या वादातुन प्रवाशी व वाहकात स्टईल झाली. वरोरा डेपोची वणी-वरोरा बस क्र.एमएच 14 बिटी 0859 हि वणी बसस्थानकावर सायं 6 वाजताच्या दरम्यान पोहचली.दरम्यान बस मधिल प्रवाशी अविनाश रघुनाथ गुरनुले (25) रा.वरोरा यांनी वरोरा ते वणी दोन तीकीट काढली व वाहकास 100 रु.दिले.चिल्लर नसल्यामुळे वाहकाने तिकीट मागे 40 रु.देने बाकी लिहीले.तसेच एका महिलेचे 70 रुपये असे एकुन 110 रुपये वाहकाने सदर महिलेकडे दिले.या कारणावरुन सदर युवकाने पैसे माझ्याकडे न देता महिलेकडे का दिले? म्हणुन वाहकावर चालुन गेला व धक्काबुक्की करुन धमकी दिली.यावेळी बसस्थानकावर प्रवाशांनी एकच गर्दि केली होती.या घटनेची तक्रार वाहक हर्षद वामन राव (23) रा.वणी यांनी पोलीसात दिली. यावरुन भादंवी कलम 186,504,506 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपिला अटक करण्यात आली.

दिवसेंदिवस वणीसह परिसरात भुरटे चोर मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत असून संधी साधून खिसा रिकामा करण्यात त्यांना महारथ झाली आहे. तर अशा चोरावर कारवाईची गरज निर्माण झाली असून जर एखादी अनोळखी व्यक्ती आपला गाव सोडून आला नी त्याच्या सोबत असे कृत्य घडले तर त्याचे काय होणार? चोरांची तर मज्जा होणार, परंतु प्रवाश्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन अशा चोरावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share