WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरातील नगर परिषद पाण्याचे व्हॉल्वला झाकण बसवावे

Image

नगर परिषद वणी ह्यांचे कडे केली ग्राहक प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षनेत्यांनी केली मागणी !

वणी शहरात पाणी पुरवठा करण्यात येतो ती पाईपलाईन रस्त्याचे मधून जाते त्या पाणी पुरवठा पाईप लाईनचे जे व्हॉल आहे त्यावर कोणचेही झाकण नाही त्यामुळे ह्यात आम पादचारी जनतेचे पायाचे हाड तुटण्याची शक्यता असून बऱ्याच झणाचे अपघात झाले आहे ह्या करीता नगर परिषदचे मुख्यधिकारी संदीप बोरकर ह्यांची भेट घेऊन वरील बाब त्यांचे निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले ह्या व्हॉल मुळे अपघात झाल्याचे आमच्या कडे तक्रारी नाही अपघाताच्या तक्रारी केल्यावर नुकसानभरपाई देणार का असे विचारले असता ते निरुत्तर झाले तरी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करू असे ते म्हणाले .लवकरच पावसाळा सुरू होत असून ह्यात शाळकरी मुलाचे अपघात झाल्यास नगर परिषद जवाबदार राहील व ग्राहक न्याय मंचातुन संबंधित अधिकऱ्या कडून लाखो रुपये नुकसान भरपाई मागण्यात येईल असे सांगण्यात आले असून लवकरच नगर विकास मंत्रालयात ह्या बाबत रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला ह्या प्रसंगी प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ व डॉ प्रशांत खैरे तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष ,अनिकेत चमाटे तालुका अध्यक्ष प्रहार विद्यार्थी पक्ष,गौरव तालकोंडावार सह नगर परिषदेचे अभियंता हजर होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share