WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरपणा तालुक्यातील मतदार यादीतील घोळ कायमच

Image

स्थलांतरित मतदाराचे नावे मतदार यादीत जैसे थे ; निवडणूक आयोगाचा पूनं निरीक्षणाचा केवळ देखावाच

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी -- राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी मतदार यादी शुद्धीकरण करण्यासाठी पून निरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला जातो.परंतु अजूनही मतदार यादीतील शुध्दी करण झाले नसल्याने अनेक वास्तव्य नसलेल्या मतदाराचे नावे मतदार यादीत जैसे थे आहे. तर अनेकानी नवीन मतदारानी नोंद करून सुद्धा त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात न आल्याने मतदार यादीतील त्रुटी कायम आहे. यामुळे निवडणूक आयोगाचा मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हा केवळ देखावा नाही ना असा सवाल उपस्थित होतो आहे.

निवडणूक आयोगा द्वारे दरवर्षी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव वगळने व चुकीच्या नावाची दुरुस्ती करणे आदी कार्यक्रम बी एल ओ च्या माध्यमातून केले जातात. तसेच बी एल ओ मार्फत अहवाल तयार करून निवडणूक अधिकाऱ्याला सादर केले जातात .मात्र त्या अहवालाला केराची टोपी दाखवत वास्तव्य नसलेल्या मतदाराचे नाव वगळण्यात येत नाही. व नवीन मतदारांची ही नावे समाविष्ट केली जात नाही. त्यामुळे नवीन मतदार हा मतदानापासून वंचित राहत असल्याने मतदाराचा नेमका आकडा किती आहे हे दृष्टीक्षेपास येत नाही. त्याच बरोबर निवडणूक दरम्यान स्थलांतरित व मयत मतदार वगळले जात नसल्याने मतदानाची ही टक्केवारी वाढली जात नाही. अनेक मतदाराची नावे अनेक ठिकाणच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याने मतदार कडून निवडणुका बघून दुबार मतदानाचा हक्क इच्छित जागेनुसार बजावला जात आहे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येत असताना अगोदर असलेल्या मतदार यादीतील नाव वगळल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असताना सुद्धा त्या मतदाराचे नाव मतदार यादीत नाव समाविष्ट केले जाते. त्यामुळे सदर मतदाराचे नावे अनेक ठिकाणच्या मतदार यादीत पाहावयास मिळते. Can Cयाचा परिणाम देशातील एकूण मतदारांची संख्या किती हे ही समजणे यामुळे अवघड ठरते आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर ,नांदा ,कोरपना वनसडी, यासह अनेक गावातील मतदार यादी मध्ये वास्तव्य नसलेल्या मतदाराचे नावे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळे निवडणुकीदरम्यान मतदाराची ओळख पटवणे अवघड होत चालले आहे. या करिता वास्तव्य झालेल्या मतदारांची नावे नसलेल्या मतदारांची नावे वगळणे करता अनेकदा ग्रामसभेतून व लेखी आक्षेप देऊन सुद्धा नाव वगळण्यात आले नाही.वास्तव्य नसलेल्या मतदारांची नावे वगळणे करता स्वतः मतदाराने नमुना ७ चा अर्ज भरून देणे गरजेचे आहे. परंतु वास्तव्य नसलेल्या मतदारांकडून हा अर्ज दिला जात नाही. त्यामुळे सदर मतदाराचे नाव वगळण्याची हिम्मत निवडणूक अधिकाऱ्याकडून दाखवली जात नसल्याचे समजते. मतदार यादी शुद्ध करण्यासाठी आधार कार्डशी सलग्न करून मतदार यादी तयार केल्यास यावर प्रभावी तोडगा होऊ शकतो मात्र तशाही प्रभावी उपाय योजना होत नसून निवडणूक आयोगाचा पुन निरीक्षण कार्यक्रम केवळ देखावा होत असल्याने त्याचा गाजावाजा करण्यात व त्रुटक सुधारणा करण्यात कोट्यावधी रुपये रिकामे खर्च होत आहे. असे चित्र आहे.

मतदार यादीचे शुद्धीकरण न झाल्यास न्यायालयात धाव घेणार

कोरपना तालुक्यातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याने त्यात सुधारणा न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जनसत्याग्रह संघटनेचे अद्यक्ष अबिद अली, राका युवक तालुकाध्यक्ष अमोल आसेकर , शेतकरी संघटनेचे अविनाश मुसळे, शिवसेनेचे अरविंद मसे, भाजप चे रमेश मालेकार, वंचित चे विजय जीवने , काँग्रेस चे भारत चन्ने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.तसेच निवडणूक पूर्वी या सुधारणा न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माहिती यावेळी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share