WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संपुर्ण विमा सुरक्षा कवच'अंतर्गत यवतमाळ अर्बन बँक कर्जदाराचे जीवन व जिवनानंतरचे आयुष्य सुखद कर

Image

संपुर्ण विमा सुरक्षा कवच'अंतर्गत यवतमाळ अर्बन बँक कर्जदाराचे जीवन व जिवनानंतरचे आयुष्य सुखद करीत आहे ! आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी,

प्रसाद नावलेकर वणी - यवतमाळ अर्बन बँक ही नेहमी बँकिंग सोबत विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करते ,आज बँकेने नवीन क्षेत्रात पाऊल ठेवले, आपले कर्ज व कर्जदार ह्यांना संपूर्ण विमा सुरक्षा अंतर्गत कर्जदाराचे आयुष्या सोबत त्याचे कर्ज सुरक्षित करून जिवंतपणी त्याचे आयुष्य उभारायला मदतच करते परंतु त्याचे आयुष्य अर्ध्यात संपले तर कर्ज विमा कंपनी भरून उर्वरीत रक्कम त्यांचे वारसाला देते ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य असे प्रतिपादन यवतमाळ अर्बन बँकेने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बंडूजी भागवत,तालुका संघ चालक होते,व्यासपीठावर राकेश खुराणा उपाध्यक्ष पुसद अर्बन बँक,संजय देरकर अध्यक्ष वणी नागरी सह.बॅक,विजय मुकेवार अध्यक्ष व्यापारी मित्र पतसंस्था,देविदासजी काळे अध्यक्ष रंगनाथस्वामी नागरी पतसंस्था,प्रशांतजी मादमशेट्टीवार विभागीय अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक,मीराताई घाटे व श्रीमती वैदेही नायगावकर संचालीका यवतमाळ अर्बन बँक,संजय चोरडिया गोविंदस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ,निलेश कटारिया गजानन नागरी संस्थेचे अध्यक्ष,टिकाराम कांगोरे अध्यक्ष गुरुदेव निधी अर्बनचे, उपस्थित होते , बँकेचे कर्जदार स्व किशोर किंगरे ह्यांचे अल्पशा अपघाताने निधन झाले त्यांनी व्यवसाया करीता 15 लाखाची कर्ज मर्यादा घेतली होती त्या पैकी अर्धी रक्कम भरली होती वरील विमा संरक्षण अंतर्गत ती माफ करण्यात येऊन उर्वरीत रक्कमेची ठेव पावती व कर्ज नसल्याचं प्रमाण पत्र आमदार संजीव रेड्डी व उपस्थित मान्यवरांचे हस्ते देण्यात आले .

प्रास्ताविकात प्रशांत मादमशेट्टीवार म्हणाले बँकेचा व्यवसाय हा व्याजावर चालतो पण अण्णाभाऊ साठे ह्या योजने अंतर्गत कर्ज प्रकरणात आम्ही व्याज ग्राहका कडून घेत नाही ते व्याज शासन आम्हाला देते , विमा कंपनी सोबत आम्ही करार केला असून कर्मचारी,कर्जदार ह्यांचे जीवन सुरक्षित केले आहे ,पूठे अजून योजना आपल्या सहकार्याने राबवायचा आहेत असे सांगून बँकेच्या सामाजिक उपक्रमाची माहीती सांगितली, संचालन प्रसाद नावलेकर वसूली अधिकारी ह्यांनी केले ,आभार प्रमोद सप्रे विशेष वसूली अधिकारी ह्यांनी केले ,कार्यक्रमाला राम देशपांडे ,रवी बेलूरकर,गजानन कासावार,अजय जरूरकर,आकाश बुधेवार,राजू मालेकर, रुपेश कोचे,दीपक दिकोडवार ,संतोष भेले,नितीन जैस्वाल,शेखर काळे ,अंबरीश दुधलवार,मकरंद देशकर ,सह रा.स्व.संघाचे पदाधिकारी,व्यापारी, बँकेचे सभासद,ग्राहक हितचिंतक व मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी गजेंद्र लोहारे शाखा व्यवस्थापक, विवेकजी बदकुले,गजानन ठोंबरे ,विजय सराफ ,संजय राजूरकर,प्रमोद उरकुडे,संजय खडसे,जीवन चौधरी,अर्जुनजी उरकुडे ,मेघा नायगावकर, विजया पुसनाके,दिलीप लोंढे, विलास पचारे,रवी लोथे, गणेश गोहणे,संजय जिन्हावार, देविदास गेडाम,संजय रिठे ,केतन लांभे सह अनेक जण कार्यरत होते ग्राहकाला विमा कंपनी कडून ह्या भागात बँके मार्फत मिळालेली सर्वात मोठी रक्कम आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share