WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाखो रुपयांच्या कचराकुंड्यांची वर्षभरातच मोडतोड

ImageImage

६०० ची बकेट १२०० ला खरेदी
प्रवासी निवारा घाणीच्या विळख्यात
गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठी श्रीमंत औद्योगिक नगरी म्हणून नांदा ग्रामपंचायतीची जिल्हाभर ओळख आहेत ग्रामपंचायतीद्वारे सन २०१७-१८ या वर्षांत कचऱ्याची व्यवस्था करण्याच्या हेतूने जवळपास अंदाजे १६२२००/- खर्च करून प्लास्टिकच्या बकेट +( कचराकुंड्या ) व लोखंडी स्टँड खरेदी करण्यात आले वर्षभरातच बहुतांश कचरा कुंड्यांची मोडतोड झाली असून नांदागावातील अनेक प्लास्टिकचे डब्बे गायब आहेत ग्रामपंचायतीद्वारे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात न आल्याने लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असुन घाणीच्या साम्राज्याने साफ सफ़ाईचे तीन तेरा वाजले आहेत कचराकुंड्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून विरोधी सदस्य आवाज उठवित नसल्याने त्यांचा आवाज दाबला गेला की काय ? अशी जनमानसात चर्चा आहेत कचराकुंड्या खरेदीत भ्रष्टाचार

बाजारात ५०० ते ६०० रुपयांच्या दराने मिळणाऱ्या प्लास्टिक बकेट ( कचरा कुंड्या ) गडचांदूर वरून १२४० रुपये अशा जादा दराने खरेदी करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने याची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुलण्याची मागणी नांदावासियानी केली आहेत

प्रवासी निवारा घाणीच्या विळख्यात

नांदाफाटा चौकातील प्रवासी निवाऱ्या जवळ गटारीचे होल वर्षभरापासून खुले असल्याने महिलांना लघुशंकेला जाण्याकरिता नाहक त्रास होतोय जवळपासचे नागरिक प्रवासी निवाऱ्याजवळ कचरा आणून टाकतात प्रवासी निवारा घाणीच्या व दुर्गंधींच्या विळख्यात आल्याने प्रवाशांना समोरील चहा टपरीवर आश्रय घ्यावा लागतो

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share