WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रहार चे सामाजिक काम पाहून नागरिकांन मध्ये उत्साह प्रहार चे काम उल्लेखनीय

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- वंदनिय, आदरणीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनाथ, अपंग, शेतकरी,कष्टकरी, शेतमजूर, विधवा,या माणसाचा आवाज आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षा मार्फत अशा सामान्य माणसाच्या कित्येक अडचणी निस्वार्थ व मुफ्त करण्यात आल्या व करण्यात येत आहे त्यातलाच एक भाग म्हणून मा आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्य सतिश बिडकर प्रहार तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी, मोतीयाबिंदु, काचबिंदू शस्त्रक्रिया , व चष्मे वाटप, कार्यक्रम गडचांदूर येथे घेण्यात आला व शिबिर यशस्वी पार पाडले जवळपास 750 ते 800 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला।

त्यातील 103 रुग्णांची महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांनी शस्त्रक्रिये साठी निवड करण्यात आली दिनांक २३/०७/२०१९ ला पहिल्या टप्प्यात ४० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले त्या पैकी ४० रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांना दिनांक २५/०७/२०१९ ला परत गडचांदूर ला सुखरूप आणल्या गेले व २५ तारखेला उरलेले बाकी रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले त्या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली व त्यांना २७ तारखेला गडचांदूर येथे आणण्यात आले शस्त्रक्रिये नंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर खूप आंनद दिसत होता प्रहार कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची ती खरी पावती होती तसेच सर्वत्र प्रहार संघटनेचे कौतुक करण्यात येत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रहार चे कार्यकरते शैलेश विरुटकर, इंजि. अरविंद वाघमारे, सागर गुडेल्लीवार, पंकज माणूसमारे,विजय बानकर दीपक चटप आकाश वराटे , गणेश ठावरी, प्रतीक खैरे, जीवन तोगरे विशेष सहकार्य अंबुजा फाऊंडेशन उपरवाही, आकाश वराटे, डॉ प्रवीण लोंनगाडगे, डॉ जयदीप चटप, यांनी केले या नंतर सुद्धा प्रहार संघटना सामाजिक कार्यक्रम राबवित राहील व अशीच सेवा करीत राहील.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर, वनसडी,आवळपुर, अंतरगाव, भोयगाव, कवठाळा, बाखर्डी, सर्व गावातील समस्या व आरोग्य विषयी मदती संदर्भात समस्या करिता 9834083738 हा नंबर आहे तरी कोणत्याही विषयी समस्या असल्यास या नंबर वर आपली समस्या पाठवा समस्या लिखित स्वरूपात आल्यास 100% समस्या निकाली काढण्याचा प्रहार जनशक्ति पक्षाचा प्रयत्न असेल

तरी आपण आम्हाला सेवेची संधी द्यावी
सतिश दशरथ बिडकर
कोरपना तालुका अध्यक्ष
प्रहर जनशक्ती पक्ष गडचांदूर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share