WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लखमापूर येथे एक कुटुंब एक फळ झाडं उपक्रम

Image

सामाजिक कार्यकर्ते डॉ सचिन मेश्राम यांचे कडून प्रत्येक कुटुंबाला एक फळ झाड भेट

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- एकचं लक्ष तेरा कोटी वृक्ष या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत २८ जुलै रोज रविवारला ग्रामपंचायत लखमापूर येथे एक कुटुंब एक फळ झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. दानशूर व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते डॉ सचिन मेश्राम यांच्या हस्ते गावातील प्रत्येक कुटुंबाला एक फळ झाड भेट म्हणून देण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले पांडुरंग पिदूरकर एकनाथ वडस्कर दादाजी आस्वले, घोरपडे सर संदीप बावणे आदी उपस्थित होते.

वृक्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे . पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यात वृक्षांची प्रमुख भूमिका असते, हे सत्य जोपर्यंत मानवाच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत मानव सुखी होऊ शकणार नाही.म्हणूनच पर्यावरणाच्या संतुलना करीता वृक्ष लावण्यासोबतच ते जगविण्याची सुद्धा तळमळ अंगी बाळगावी असें मत सामाजिक कार्यकर्ते डॉ सचिन मेश्राम यांनी व्यक्त केले. माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले म्हणाले की प्रत्येकांना दिलेली फळ झाडे घरी लावून त्या झाडांचे आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे संरक्षण करावे असे सांगितले. लखमापूर येथील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या आवडीचे फळ झाड वितरण करण्यात आले यामध्ये आंबा फणस बदाम जांब चिकू डाळिंब जांभूळ सीताफळ इत्यादी झाडाचा समावेश होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share