WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चित्रा बावणे यांना निरोप व सत्कार

Image

सुरज चाटे वणी :- येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्र. 8 च्या जेष्ठ शिक्षिका चित्रा बावणे यांना वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती रंजुताई झाडे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगर सेवक धनराज भोंगळे, शाळा समितीच्या अध्यक्षा प्रतिभा मानकर, नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार, शंकर आत्राम, प्रमोद जोगी सविता रासेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या शाळेचे मुख्याध्यापक बंडू कांबळे यांनी केले.

शिक्षण सभापती रंजुताई झाडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, साडी चोळी देऊन शांताराम बावणे यांच्यासह सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित अतिथींनी चित्राताई बावणे यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देतांना नगर परिषद शाळेत नोकरीवर लागल्यानंतर ज्या ज्या सहकाऱ्यांची मदत झाली त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमा चे संचालन किशोर चौधरी यांनी केले.आभार प्रदर्शन देवेंद्र खरवडे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share