WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अमरावती विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?.....

Image

संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या गुण परिक्षणाबाबत विद्यार्थी संभ्रमात...... तब्बल 25 विद्यार्थ्यांना शून्य गुण :- विद्यार्थ्यांनी दिले प्राचार्यांना निवेदन.....

सुरज चाटे वणी :- नुकताच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा वाणिज्य तृतीय वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 53 विध्यार्थी नापास तर तब्बल 25 विद्यार्थांना इंग्रजी या विषयात 0 गुण मिळाल्याने विध्यार्थी चांगलेच अडचणीत आले असून गुण परिक्षणाबाबत विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी दिसून येत असून संतापाच्या भरात विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना निवेदन देत पेपर पुनरतपासणीची मागणी करून निकाल 10 दिवसाच्या आत लावावा अशी मागणी केली आहे जेणेकरून त्याचे वर्ष वाया जाणार नाही जर विद्यापीठाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास विध्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल व त्याचे वर्ष वाया जाईल.

लोकमान्य टिळक महाविद्यालय हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मध्ये येतात. दि. 27 एप्रिल ते 15 मे या दरम्यान वाणिज्य तृतीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली. व 45 दिवसात विद्यापीठाच्या नियमानुसार निकाल लागण्यात येतो परंतु हा निकाल 25 जुलै ला लागला म्हणजे हा निकाल 45 दिवसावरून 70 दिवसावर गेला. व या निकालामध्ये महाविद्यालयातील 53 विद्यार्थी नापास झाले व जवळपास तीस विद्यार्थ्यांना 00 मार्क्स मिळाले. या मध्ये 70% टक्के मार्क मिळणारे विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांनि थेट संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर असा आरोप केला की विद्यापीठाच्या हलगर्जीपणा मूळे आम्ही नापास झालो आमचे पेपर योग्य गेले असून आमचे गुण परीक्षण योग्य रित्या करण्यात आले नाही. त्यामळे आमच्या इंग्रजी विषयाच्या पेपर चे मूल्यांकन पुन्हा अमरावती विद्यापीठाने करावे व 10 दिवसाच्या आत मध्ये निकाल लावावा कारण पुढील शिक्षणासाठी प्रवेश लवकरच बंद होणार आहे.

जर हा निकाल एक महिन्यानंतर लागला तर विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान होईल तरी तातडीने योग्य ती उपाययोजना करीत आम्हा विद्यार्थाना न्याय मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांनि निवेदनातून प्राचार्यांना केली.

विद्यार्थांना न्याय मिळणार का?....

अमरावती विद्यापीठात वाणिज्य तृतीय वर्षाचे ज्यांनी इंग्रजी विषयाचे पेपर तपासले त्यांनी पेपर नेमके योग्य तपासले का? असा सवाल विधर्त्यांच्या मनात घर करीत असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा 0 गुण असल्यामुळे विध्यार्थ्यांचे नाहक नुकसान होत असून त्यांना अखेर न्याय मिळणार काय असा प्रश्न उपस्थित होत असून अमरावती विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे?....

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share