WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संस्कार भारती समिती तर्फे गुरुपूजन सोहळा व कवी संमेलन संपन्न

ImageImageImage

येथील संस्कार भारती समिती, नगर वाचनालय व विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे गुरुपूजन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा निमित्त निमंत्रित कवीचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष गजानन कासावार, प्रमुख अतिथी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे सचिव प्रा. अभिजित अणे व संस्कार भारती समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कविता चटकी या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात रजनी पोयाम यांनी त्यांचे गुरू गजानन कासावार, आई साधना भादीकर तसेच रुपाली सालकाडे यांचे गुरू वडील शशिकांत व आई स्नेहल सालकाडे यांच्या गुरुपूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता चटकी यांनी केले.

याप्रसंगी आयोजित कविसंमेलनात 'श्रावण धारा ' या विषयावर स्वप्ना पावडे, रजनी पोयाम, स्नेहलता चुंबळे, शंकर घुगरे, लता लोढा, राजेश महाकुलकर, अमोल खडसे, सुनंदा गुहे, मीनाक्षी गोरंटीवार, यांनी स्वरचित कविता सादर केल्या. त्यांना संस्कार भारती समिती तर्फे सर्व कवींना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी अतिथीं सह अशोक सोनटक्के यांनी गुरूंचे व गुरू पूजनाचे महत्व समजावून सांगितले. उदघाटनीय कार्यक्रमाचे संचालन रुपाली सालकाडे यांनी केले असून स्वरचित कविता सादर केली तसेच प्रवीण सातपुते यांनी कवी सम्मेलनाचे संचालन व कविता सादर केली. आभार प्रदर्शन निकिता बोबडे यांनी केले असून कृष्णा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले.

संस्कार भारती समिती वणी शाखेचे महामंत्री व कार्यवाहक सागर मुने,उपाध्यक्ष पूजा गढवाल, वनिता काकडे, राणी हांडे,शंतनू मुने, साक्षी खुसपुरे, प्रणय मुने यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share