WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अमरावती विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा?....

Image

अमरावती विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा?....

मारेगाव येथील तीस टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीत शून्य गुण....

विध्यार्थ्यांचे वर्षभराच्या नुकसानिस जबाबदार कोण....

यवतमाळ: नुकताच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा वाणिज्य तृतीय वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे मारेगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील 65 टक्के विध्यार्थी नापास तर तब्बल 30 टक्के विद्यार्थांना इंग्रजी या विषयात 0 गुण मिळाल्याने विध्यार्थी चांगलेच अडचणीत आले असून गुण परिक्षणाबाबत विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी दिसून येत असून संतापाच्या भरात विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना निवेदन देत पेपर पुनरतपासणीची मागणी करून निकाल 10 दिवसाच्या आत लावावा अशी मागणी केली आहे जेणेकरून त्याचे वर्ष वाया जाणार नाही जर विद्यापीठाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास विध्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल व त्याचे वर्ष वाया जाईल.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील कला वाणिज्य आणि विझान महाविद्यालय हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मध्ये येतात. दि. 27 एप्रिल ते 15 मे या दरम्यान वाणिज्य तृतीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली. व 45 दिवसात विद्यापीठाच्या नियमानुसार निकाल लागण्यात येतो परंतु हा निकाल 25 जुलै ला लागला म्हणजे हा निकाल 45 दिवसावरून 70 दिवसावर गेला. या निकालामध्ये महाविद्यालयातील जवळपास65% विद्यार्थी इंग्लिश या विषयात नापास झाले तर जवळपास 30% विद्यार्थ्यांना 00 मार्क्स मिळाले. या मध्ये 73% टक्के मार्क मिळणारे विद्यार्थी नापास झाले.

या मध्ये अशी एक विद्यार्थीनि आहे जी गेल्या तीन वर्षांपासून महाविद्यालयाची टॉपर विद्यार्थ्यांनि व या वर्षी तिला 74% मिळाले ती सुद्धा इंग्लिश विषयात नापास झाली. जर नापास नसती तर महाविद्यालयात ती प्रथम असती. विद्यार्थ्यांनि थेट संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर थेट असा आरोप केला की विद्यापीठाच्या हलगर्जीपणा मूळे आम्ही नापास झालो. त्यामळे आमच्या इंग्रजी विषयाच्या पेपर चे मूल्यांकन पुन्हा अमरावती विद्यापीठाने करावे व 10 दिवसाच्या आत मध्ये निकाल लावावा कारण पुढील शिक्षणासाठी प्रवेश लवकरच बंद होणार आहे. जर हा निकाल एक महिन्यानंतर लागला तर विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान होईल अशी मागणी विद्यार्थ्यांनि निवेदनातून प्राचार्यांना केली.या वेळी सागर नावडे, विपुल पोटे, रोहन आदेवार, योगेश चौधरी, अभि नैताम, प्रज्वल खाडे, चेतन भोयर, निखिल मिलमिले, शीतल ढेंगळे, कोमल धोटे, पूजा गारघाटे, श्रद्धा देवाळकर, शुभांगी खंडाळकर व इतर विद्यार्थी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share