WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्रामसेवक नागेश्वर जिड्डेवार यांना सेवानिवृत्त वेतन इतर लाभ न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ...

Image

येथील निवासी नागेश्वर जनार्धन जिड्डेवार हे नियत वयोमानानुसार दि. 31 डिसेंबर 2016 ला पांढरकवडा पंचायत समिती मधून ग्रामसेवक या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर 31 महिने लोटल्यानंतर सुद्धा त्यांना हक्काचे सेवानिवृत्ती वेतन व इतर कोणतेही लाभ त्यांना न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. झरी तालुक्यातील इसरकर या विस्तार अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावर ही स्थिती उद्भभवली आहे. जिल्हा प्रशासनाने सुद्धा या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

ग्रामसेवक म्हणून नागेश्वर जिड्डेवार यांची प्रथम नियुक्ती मारेंगाव पंचायत समिती मध्ये झाली. त्यानंतर झरी व पांढरकवडा पंचायत समितीत त्यांची सेवा झाली आहे. सेवानिवृत्ती नंतर किमान सेवानिवृत्ती वेतन नियमाप्रमाणे देणे आवश्यक असतांना सुद्धा अडीच वर्षाच्या कालावधी नंतर सुद्धा झरी येथील विस्तार अधिकारी इसरकर यांनी अद्यापपर्यंत ना देय, ना चौकशी प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला न पाठविल्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती वेतानासह पेन्शन विक्री, उपदान यासह कोणतेही लाभ त्यांना मिळाले नाही.

निवृत्तिवेतन व इतर लाभ यांना मिळू नये यासाठी त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या सेवानिवृत्त ग्रामसेवका वरील उपासमारी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share