WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत डीजे बँड वर होणार कारवाई.....

Image

शांतता कमेटीच्या सभेत पोलीस पाटलाने दिली ग्वाही....

वणी

शांतता कमेटीची सभा वणी पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्यात आली. डीजे वर बंदी आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी दिली. त्यावर गोंदिया डीजे बँड वर बंदी राहील का तसेच राजकीय पुढारी व आमदार खासदार यांचा फोन आल्यास कारवाई होणार की नाही, असा प्रश्न भारतीय कॅमुनिस्ट पक्षाचे तालुका सचिव प्रा. धनंजय आंबटकर यांनी उपस्थित केला. त्यावेळी पोलीस पाटील नितीन शिरभाते म्हणाले यापूर्वी कारवाई झाली आहे व याही वर्षी पण होणार अशी ग्वाही पोलीस प्रशासनाच्या वतीने दिली. खरंच वणी पोलीस गोंदिया डीजे बँड वर कारवाई करणार की बोलायचं वेगळं व करायचं वेगळं अशी भूमिका तर राहणार नाही. याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

होणाऱ्या उत्सवा निमित्त शांतता कमिटीची सभा संपन्न झाली. त्यामध्ये श्रीक्रुष्ण जन्माष्टमी,पोळा,गणपती, मोहरम आदी सन उत्सव आगामी काळात असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये,या उद्देशाने या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु,मुस्लिम सन उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडु नये,याकरीता उपाय योजना आखण्यात आल्या. या बैठकित नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे,ना.तहसिलदार पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक,ठाणेदार वैभव जाधव,विधुत विभागातील अधिकारी,नगर परिषदेचे उप मुख्यधिकारी,अभ्यंता व शांतता कमेटीचे सदस्य,गणपती मंडळांचे अध्यक्ष व पञकार उपस्थित होते.

डिजे,अवैद्य दारु,गांजा तस्करी,रस्त्यांची समस्या,वाहतुक याबाबत समस्या मांडण्यात आल्या.बैठकित शांतता कमेटीतील सदस्यांनी विविध समस्यांबाबत आपले मत मांडले.त्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी दिले.त्याच प्रमाणे गोकुल अष्टमी,पोळा,गणेश उत्सव,मोहरम हे सन उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता कमेटीतील उपस्थित असणार्या सर्व सदस्यांनी सहकार्य करावे.अशीही विनंती करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन रवि साल्पेकर यांनी केले.तर आभार पोउनि.फटींग यांनी मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share