WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तरूणाची विष प्राशन करून आत्महत्या…

Image

मार्डी-मजरा

मारेगाव तालुक्यातील मजरा या गावातील संजय भाऊराव आत्राम (वय34) रा मजरा असे मृताचे नाव आहे. सोमवारला सायंकाळी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

संजयला गावातील काही लोकांकडुन मारहाण करण्यात आल्याची तक्रार खुद मृताच्या आईने तुळसाबाई आत्राम पोलिसांना दिली गावातील शंकर निपुंगे, सोनु निपुंगे आणि हरिदास निपुंगे यांच्यावर मारहाण करण्याचा हा आरोप करण्यात आला आहे. मारहाणी नंतर संजयने आतमहत्या केली. ही घटना संजयने आईला सांगितले असे तुळसाबाई आत्राम हिने पोलिसांना दिलेल्यातक्रारीत म्हटले आहे. आत्राम कुटुंबीयाची सदर आरोपीवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून कडक कारवाही करण्यात यावी. संजय विवाहीत असून त्याच्या पाठीमागे पत्नी, आई तसेच दोन वर्षाची लहान मुलं आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share