WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वर्णलीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत स्पर्धेत मारली बाजी......

Image

वणी शहरात नुकताच संस्कृत सप्ताह संपन्न झाला. यात संस्कृत भाषेचा प्रचार व्हावा व ती भाषा घरा घरात पोहचवून प्रत्येकाने ती बोलावी या करिता संस्कृत भारती वणी शाखा, जैताई देवस्थान, टिळक महाविद्यालयात संस्कृत विभागा तर्फे संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्कृत महोत्सवात श्लोक लेखन, संस्कृत नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. नृत्य स्पर्धेची सुरुवात जिया कटारिया,अदिती अणे, अवनी शुक्ला, देविका वर्मा यांच्या सामूहिक नृत्याने झाली होती. शहरातील अनेक शाळेने त्यात सहभाग घेतला होता. मात्र अदिती अणे हीचा नृत्यात प्रथम क्रमांक व जिया कटारियाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संस्कृत श्लोक लेखन स्पर्धेत शिल्पी कुकडेजा हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

यासाठी स्वर्णलीला शाळेच्या संस्कृत शिक्षिका रुपाली सालकाडे यांनी परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांनी यश सुध्दा मिळविले. तसेच जागतिक छायाचित्र दिनानिमित्त झालेल्या चित्रकला स्पर्धेत स्मित राऊत याने प्रोत्साहन पर बक्षीस प्राप्त केले. यासाठी शाळेचे संस्थापक क्रिशन जैन, प्राचार्य सी. सिवा रामकृष्णा,उपप्राचार्य मंगेश आवारी, सर्व शिक्षक वृंद यांनी कौतूक केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share