WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंटमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी.

Image

(वेशभुषेतिल चिमुकल्यानी वेधले उपस्थितांचे मन)

देव येवले प्रतिनिधी – झरी तालुक्यातील अडेगाव येथील जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट शाळेत आज 23 ऑगस्ट शुकवार रोजी शालेच्या प्रांगणात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने सामाजिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवन्यात आला या वेळी शालेय विद्यार्थ्यानी दही हंडी फोडून व वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करुण उपस्थितांचे लक्ष वेधले होते.

त्या प्रसंगी एक सुंदर वेशभूषा स्पर्धा पण ठेवण्यात आली. स्पर्धेत 39 चीमुकल्यानी सहभाग घेतला. त्या स्पर्धेमधे कृष्णाच्या वेशभुषेतील पहिला क्रमांक लोकेश घाटे, दुसरा, सार्थक झाडे व तिसरा युग क्षीरसागर तर राधेच्या वेशभुषेतिल पहिली तन्वी गडकर, दुसरी आरोही चुधरी तर तीसरी चैताली आसुटकार यांनी क्रमांक पटकाविला या स्पर्धेचे परीक्षक म्हणुन गड्डमवार मॅडम, अक्केवार सर, गावंडे सर, सातपुडके मॅडम, मासीरकर सर, धोंगडे सर, हरिदास खोबरे यांनी जबाबदारी पार पाडली

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थांपक संदीप आसुटकार, झाडे मॅडम, मांडवकर मॅडम यांनी उत्तमरित्या केले या प्रसंगी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share