WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अंतर शालेय नृत्य स्पर्धेत स्वर्णलीला अव्वल.....

Image

सागर मुने, वणी

स्वातंत्र्य दीना निमित्त रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी द्वारा आयोजित देशभक्ती गीतांवर आधारित आंतर शालेय नृत्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत वणीतील विविध शाळेंनी सहभाग घेतला होता. अ व ब असे दोन गट असून स्वर्णलीला शाळेचा अ गटामध्ये द्वितीय क्रमांक व ब गटात प्रथम क्रमांक पटकावला.

या समूह नृत्यात अ गटामध्ये जतीन बासमवार, नमन गायकवाड, भूषण नखाते, श्रीजी अग्रवाल, समृद्धी टोंग, कस्तुरी वैद्य, श्रावणी सांबरे,पल्लवी पेटकर, आयुषी काटकर, सौम्या मुथा.

ब गटामध्ये श्रद्धा चौधरी, महेक लाल, वैदिक झिलपे, मधुर दरने, प्रेक्षा छाजेड, विनय बेलेकर, वेदांत देठे, श्रेया आबाड, आनंद सूर, वेदांत महाजन, मंथन उत्तरवार, तनिष्का पडोळे या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले.

शाळेचे नृत्य शिक्षक जतीन राऊत व सचिन आत्राम यांनी परिश्रम घेतले. या यशाचे कौतुक शाळेचे संस्थापक क्रीशन जैन, प्राचार्य सी. सिवा रामकृष्णा, उप प्राचार्य मंगेश आवारी व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share