WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत मनोरंजन क्लब वर पोलिसांची धाड......

Image

सागर मुने, वणी

महसुल व पोलीसांची संयुक्त कारवाई....

वणी शहरातील विविध ठिकाणी मनोरंजन क्लब सुरू असलेल्या अड्ड्यावर धाड टाकून,क्लब मधिल साहित्य हस्तगत केले आहे. वणी शहरात मटका बंद आणी क्लब सुरु अशी स्थिती निर्माण झाली होती.शहरातील मटका सट्टा बंद असल्यामुळे शहरात विविध ठिकानी मोठ्याप्रमाणात मनोरंजन क्लब अड्डे सुरु झाले होते.परिणामी शौकिन शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या मनोरंजन क्लबवर खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या जात होती.

याची माहिती काही तरुणांकडून वणी पोलिस स्टेशनला मिळाली त्यांनी सदर क्लब बाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील मनोरंजन विभागाकडून माहिती घेतली असता वणी शहरात एकही परवानाधारक मनोरंजन क्लब आज स्थितीत अस्तित्वात नाही. व पुर्वी असलेला एक क्लब कालबाह्य झालेला आहे. त्यामुळे हे सर्व मनोरंजन क्लब बोगस असल्याची माहीती वणी पोलिसांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे वणी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या वणी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या या मनोरंजन क्लबवर धाडी टाकल्या असता त्यांना समाधान कारक दस्तावेज या क्लब कडून मिळाले नाही.त्यामुळे त्यांनी सदर क्लब वर कारवाई करत त्या ठिकाणाहून काही लोकांना ताब्यात घेत त्या ठिकाणी असलेला खेळासाठी वापरल्या जाणारा मुद्देमाल हस्तगत केला.सदरची कारवाई महसूल व वणी पोलीस विभागाने संयुक्त पुणे केली असुन पुढिल कारवाईसाठी अहवाल जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याची माहीती मिळाली.या मनोरंजन क्लबला परवाने देणारा तो मास्टरमाईन्ड कोन?याचाही तपास सुरु करण्यात येणार असुन जिल्ह्यात बोगस परवाने वाटप करणार्यांची टोळी सक्रीय असल्याचे बोलल्या जात आहे.कारण मनोरंजन क्लब चे परवाने जिल्ह्यात फक्त तिनच असल्याचेही या कारवाईमुळे उघड झाले आहे.परिणामी या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक बोगस मनोजंन क्लब वर कारवाई होनार? असे बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share