WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदिवासी वृद्धाची बँकेतच दहा हजारांची रोकड चोरट्यांने केली लंपास

Image

प्रतिनिधी सचीन मेश्राम मारेगांव यवतमाळ

मारेगांव (जिल्हा यवतमाळ) तालुक्यातील घोगुलदरा येथील आदिवासी नागरिक लखमा कोंडेकर (वय 74)याचे मारेगांव येथील विदर्भ कोकण बँक खात्यातून दहा हजारांची रोकड चोरट्यांने मंगळवारी (ता 27) लंपास केली लखमा कोंडेकर हे पैसे काढण्याकरिता मारेगांव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आले होते त्यावेळी एका व्यक्तीस त्यांनी बँक खात्यातून दोन हजार काढण्यासाठी पावती भरण्यासाची विनंती केली होती मात्र त्या व्यक्तीने दहा हजार रुपयांची रक्कम लिहिली त्यानंतर रोखपाल यांच्याकडे पावती दिली .रोखपालांनी दहा हजार रुपयाचा . अनोळखी व्यक्तीने पैसे मोजून देतो,असे सांगून वृद्धास ठिकाणी नेले. साहेबाकडुन आठ हजार परत बँकेत जमा करण्याकरिता सही द्यावी. लागते, असे सागुन त्याने रोकड खिशात घातली त्यानंतर वृद्धास दुचाकीवर बसवून वर्दळीच्या ठिकाणी आणले.साहेबाची सही आणतो असे सागुन वृद्धास दुचाकीवरून उतरविले आणि चोरटा रोकड घेऊन लंपास झाला घडलेला प्रकार सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाला आहे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लखमा यांच्याकडे अल्पशेती आहे यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे दहा हजार रुपये वृद्धापकाळात उदरनिर्वाह करण्याकरिता जमा केले होते घडलेल्या प्रकारची घोगुलदरा येथील सरपंच तुकाराम आस्वले यांच्या समक्ष.पोलीसांत तक्रार दाखल केली. वृद्ध लखमा पोळ्या या सणाचा बाजरातून वस्तू खरेदी करण्यासाठी सोमवारी बँकतून हजार रूपये काढण्याकरिता आले होते. अंधार पडला तरी लखमा घरी आले नाही .या कारणाने वूद्ध पत्नी चिंताचुर झाली होती वृद्ध पत्नीने सरपंचांच्या घरी विचारणा केला तेव्हा हा प्रकार लक्षात आला

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share