WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अ. भा. गं. संगीत महा. वणी केंद्रावर जगदीश ठावरी यांची नियुक्ती......

Image

वणी : येथील विवेकानंद संगीत विद्यालयात 25 वर्षांपासून अखिल भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय मुंबई द्वारे परीक्षा केंद्र सुरू आहे. या संगीत परीक्षा केंद्रच्या संचालक पदावर जगदीश ठावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वणी, झरी, मारेगावं तालुक्यातील हे एकमेव संगीत परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर प्रारंभिक ते विशारदपूर्ण पर्यंत च्या सर्व परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेताल्या जातात. गायन, तबला, हार्मोनियम, बासरी अशा परीक्षा गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई तर्फे घेण्यात येतात. साधारणतः 150 विद्यार्थी एका सत्रात परीक्षा देत असून योग्य गुणांक घेऊन उत्तीर्ण होत असतात.

मागील 22 वर्षांपासून संगीत शिक्षक राम पवार यांनी केंद्र संचालक म्हणून जवाबदारी पार पाडली. मात्र 2019 नोव्हेंबर पासून च्या सत्रात विवेकानंद विद्यालयाच्या शाळा समितीने घेतलेल्या ठरावा नुसार जगदीश ठावरी यांना पदभार देण्यात आला आहे. संगीत केंद्र संचालक पदावर निवड झाल्याने परिसरातील सर्व संगीत शिक्षक व रसिकांनी अभिनंदन केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share