WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

न.प. शाळा मध्ये शिक्षक दिनी स्वयंशासन..... शिक्षण सभापतींची प्रत्येक शाळेला भेट....

Image

वणी:- येथील नगर परिषद अंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये 5 सप्टेंबरला सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हारार्पण करून स्वयं शासनासह विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या निमित्त वणी नगर परिषदेच्या शिक्षण सभापती रंजुताई झाडे यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन प्रत्येक शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव केला. स्वा. सावरकर शाळा क्र.5 मध्ये 10 विद्यार्थ्यांनी स्वयं शासनात सहभागी होऊन शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. यात मुख्याध्यापक म्हणून आठव्या वर्गातील विद्यार्थिनी स्नेहा तिवारी हिने काम केले. मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्यासह मीना काशीकर, रजनी पोयाम, अविनाश तुंबडे, गीतांजली कोंगरे, दर्शना राजगडे यांनी पर्यवेक्षण केले. रा.तुकडोजी महाराज शाळा क्र. 7 मध्ये 12 विद्यार्थ्यांनी स्वयं शासनात भाग घेऊन पूर्ण शाळा चालविली. मुख्याध्यापक म्हणून आर्यन रासेकर यांनी काम केले. या शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोरे यांच्यासह सिंधुताई गोवरदीपे, कल्पना मुंजेकर, वंदना परसावार, चंदू परेकर, मंगला पेंदोर, शुभांगी वैद्य, विजय चव्हाण यांनी पर्यवेक्षण केले. म.गांधी नगर परिषद शाळा क्र.1 मध्ये 15 विद्यार्थ्यांनी स्वयंशासनात भाग घेतला. येथील मुख्याध्यापक शंकर आत्राम यांच्या सह शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. किडझी प्ले स्कुल, वणी येथील किडझी प्ले स्कुलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ज्यु. के. जी. व सी. के. जी. चे विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका म्हणून पूर्ण वेळ विविध वर्गात तासिका घेत होते. त्यांची शिकविण्याची पद्धत व आवड बघता भविष्यात यातून काही उत्कृष्ट शिक्षक व शिक्षिका तयार होतील असे प्राचार्य प्रवीण सातपुते यांनी कौतुक करत मत व्यक्त केले. तर शिक्षिका आरती सातपुते, अपर्णा बडवाईक व शीतल निंबाळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना या शिक्षक दिनाचे महत्व समजावून सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share