WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे विमाशिचे अधिवेशन थाटात संपन्न.... व्हि. बी. टोंगे यांचा सत्कार

Image

वणी : शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने लढणाऱ्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अधिवेशन नुकतेच वणी येथे धनोजे कुणबी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले यवतमाळ सह चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले या अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षक आमदार व्हि यु डायगव्हाणे यांचे शुभहस्ते झाले याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्रावण बरडे तथा सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले अमरावती जिल्हा कार्यवाह दिलीप कडू अमरावती विभागीय कार्यवाह एम.डि. धनरे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख , जयप्रकाश धोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे ,कार्यवाह श्रीहरी शेंडे, संघटक मनोज प्रभाकरराव पारखी, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार ,संघटक सचिव संदीप चौरे ,इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनेला आपले संपूर्ण आयुष्य देणाऱ्या व्हि.बी.टोंगे सरांचा याप्रसंगी घेतलेल्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या वेळी उपस्थितीत शिक्षकांच्या नेत्रकडा आपोआप पाणावल्या होत्या. गोविंद ठावरी शामसुंदर बोढे ,कमलाकर चुंबळे ,आनंद मेश्राम ,यांचा सुद्धा संघटनेप्रती कार्याचा गौरव म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्हि. यू. डायगव्हाणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात संघटनेच्या विविध कार्याचा गौरव तर केलात सोबतच जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर काही शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत समस्या वर संघटनेची दिशा आणि आजपर्यंत संघटनेने या विषयावर केलेली कामे याविषयी उपस्थितांसोबत सांगोपांग संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे यांनी केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याविषयी जिल्हाध्यक्ष अशफाक खान व दिवाकर नरुले यांनी प्रकाश टाकला. तसेच वनी तालुका अध्यक्ष किशोर बोढे व मारेगाव शहर उपाध्यक्ष ए डी पेचे यांनी स्थानिक समस्यांचा ऊहापोह केला. अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात 14 ठराव विचारविनिमय करून पारित करण्यात आले .सदर ठरावाची जाहीर वाचन गजेंद्र काकडे यांनी केले. कार्यकर्त्यांच्या वतीने व्हि यु डायगव्हाणे सरांना अर्पण करण्यात आलेले मानपत्र या कार्यक्रमाचा गौरव बिंदू ठरला कार्यक्रमाचे आणखी एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे स्वागताध्यक्ष गंगारेडडी बोडखे यांच्या 'अंधारलेल्या वाटा' या पुस्तकाचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला प्रकाशन सोहळा. भूपेंद्र देरकर आणि जयश्री राजूरकर यांनी मानपत्राचे लयबद्ध वाचन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि श्रीमती नुसाबाई चोपने विद्यालयाच्या चमूने गायलेल्या प्रार्थना गीताने झाली. तर कार्यक्रमाची सांगता वनी तालुका कार्यवाह दत्तू महाकुलकर यांच्या आभार प्रदर्शनाने आणि राष्ट्रगीताने झाली .वंदना शंभरकर आणि सोनाली कोंडेवार यांच्या ओघवत्या शैलीच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारणी तसेच वनी, मारेगाव व झरी तालुक्यातील संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.**

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share