WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बळगा.... महसूल विभागाची कारवाई :- तीन टिप्पर जप्त....

Image

वणी :- सुरज चाटे प्रतिनिधी

वणी तालुक्यातील रांगणा भुरकी घाटावर काहीदिवसापासुन मोठ्याप्रमाणात अवैद्य रेती वाहतुक होत असल्याची चर्चा सुरु होती.याबाबतची माहीती येथिल तहसिलदार शाम धनमने यांना मिळताच सदर घाटावर धाड टाकण्यात आली.यावेळी रेती भरुन जात असलेले तीन टीप्पर जप्त करण्यात आले.

दि.21 सप्टेंबरच्या मध्यराञी रेती तस्करी होत असल्याची माहीती येथिल तहसिलदार शाम धनमने यांना मिळताच रांगणा भुरकी घाटावर मध्य राञी 2 वाजताचे सुमारास धाड टाकला असता एमएच- 29 टी – 2077, एमएच – 06 एक्यु 9507 दोन्ही रुद्रा ट्रेडर्स यवतमाळ तर एमएच – 31 सिबी 8346 बालाजी ट्रेडर्स पुलगाव हे तीन्ही टीप्पर रेती भरुन जात असल्याचे आढळले.सदर तिन्ही टीप्पर जप्त करण्यात आले अाहे.

सदरची कारवाई उपजिल्हाधिकारी महेंद्रकर यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार शाम धनमने व त्यांच्या पथकाने केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share