WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निलेश सपाटे राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित

ImageImage

वणी:- अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्रातील उत्कृष्ठ शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 25 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यात वणी पंचायत समितीतील परमडोह येथे कार्यरत निलेश रामभाऊ सपाटे यांचा शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या पूरस्कार प्रदान समारंभात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, गंगाधर म्हमाणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दिलीप सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते निलेशचा सत्कार करण्यात आला.

वणी पंचायत समिती मधील उपक्रमशील शिक्षक निलेश सपाटे यांनी परमडोह येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पूर्ण पणे प्रगत करण्याचा ध्यास घेऊन कार्यरत आहेत. त्यामुळे येथील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्या या कार्याचा झालेल्या यथोचित गौरवाबद्दल वणी पंचायत समितीच्या सभापती लिशाताई विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे, गटविकास अधिकारी राजेश गायनर, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, विस्तार अधिकारी लक्ष्मण इड्डे शाळेचे मुख्याध्यापक हंसराज काटकर व शिक्षक वृंद त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share