WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार शिवणी येथील घटना

Image

आथिँक मदतीची गावकऱ्यांची मागणी

*न्यूज प्रतिनिधी* *यवतमाळ :-संघर्ष भगत* .सिदेवाही तालूक्यातील शिवणी येथील वनपरिक्षेत्राअंतर्गत वाघाने हल्ला करून गुराख्याला ठार केल्याची घटना काल रविवारी ता २९)घडली .येथील म् तूक तुळशीरांम पाकेवार (वय ५५)असे म् तूकांचे नाव आहे.या घटनेने नागरीकांत भीतीचे वातावरन पसरले असून .वनविभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा .अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

सिंदेवाही तालूक्यातील शिवनी येथील तुळशीदास पाकेवार हे गुराखी म्हणून कांम करीतहोते.गावातील पाळीव जणावरे जंगलात चराईला नेणे ही बाब त्यांची नित्याचीच होती .रविवारी सकाळी ते गावातील जनावरे घेऊन जंगलात गेले होते.गुरे चराई करीत असतांना शिवणी वनपरिक्षेत्रात झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला .यात तुळशिदास पाकेवार यांचा घटनास्थळीच म् त्यू झाला.घटणेची माहीती मिळताच गावकऱ्यांनी घटणास्थळाकडे धाव घेतली .त्यानंतर वनविभागाला घटनेची माहीती दिली.वनविभागाच्या अधिकारी .कर्मचाऱ्यांनी घटनास्ळ गाठून पंचनामा केला.वाघाचा तत्त्काळ बंदोबस्त करावा .अशी मागणी गावकऱ्यांनी केली.तसेच म् त तुळशीदास पाकेवार यांच्या परिवाराला आथिँक मदत देण्याची मगणीसुध्दा गावकऱ्यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share