WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निवडणूक काळात बकऱ्या चोरांचे थैमान..... परप्रांतीय अनोळखी इसमांचा वापर :-

Image

ह्या बकऱ्या जातात कुणाला ?....

वणी :- सुरज चाटे प्रतिनिधी

सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमी सुरू असताना एकीकळे आमदारकी तर दुसरीकडे बकऱ्या चोरांनी आपले थैमान घातले असून त्यांनी सर्वसाधारण व्यक्तीला चांगलेच परेशान केल्याचे दिसून येत असून आता या टोळीचे नेतृत्व परप्रांतीय अनोळखी इसमाच्या माध्यमातून करीत असल्याची चर्चा रंगत असून ह्या चोरी केलेल्या बकऱ्या कुणाच्या घशात? जात आहे अशा चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्या अगोदर वणीसह परिसरात चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातला होता त्यांच्या मुसक्या आवळण्यात वणी पोलिसांना यश आले होते यावेळी वणी पोलिसांनी मोठ्या कारवाया सुद्धा केल्या होत्या, आता चक्क बकरी चोरांनी आपले थैमान पसरवले असून चक्क अनोळखी व्यक्ती दुचाकीने मिळेल त्या वाहनाने येत रस्त्यावरील दिसेल ती बकरी उचलून विकण्याचा प्रकार निदर्शनास येत असून वणी शहरालागतच असलेल्या लालगुडा चौपाटी परिसरातील एम आय डी सि रोडला एक महिला विजय मारोती मोरे यांच्या मालकीची बकरी चारण्याकरिता गेली असता दोन अनोळखी इसम दुचाकी ने येत भाल्लर रोड वर असलेल्या बकरिला आपल्या दुचाकी वर घेत रफुचक्कर होण्याचा प्रकार घडला असून सदर महिलेने त्या अनोळखी इसमांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुचाकीचा वेग वाढवून पळ काढण्यात बकरी चोर यशस्वी झाले सदर महिलेने घडलेला प्रकार परिसरात सांगितला परंतु त्या बकरी चोरांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. परंतु निवडणूकीच्या काळात अशा या बकरी चोरांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून हे बकरी चोर कुणाला चोरीच्या बकऱ्या विकतात? हा मात्र चर्चेचा विषय आहे

संपूर्ण परिसर निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असून याचा फायदा तर बकरी चोर उचलत नाही ना? अशा सुद्धा चर्चा परिसरात जोर धरताना दिसत असून आता या मागचा नेमका मास्टरमाइंड कोण हे मात्र गुलदस्त्यात असून परप्रांतीय इसमांचा वापर करीत हा सगळा प्रकार चालत असल्याची खमंग चर्चा रंगत असून अशांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने अशांवर कारवाईचा बाळगा काढण्याची गरज असून जनसामान्यांना या पासून होणारा त्रास कमी करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक नेत्यांची न जाते मुक्या जनावरांचा जीव...

निवडणुकीचे वारे आता जोरात सुरू असून निवडणुकी काळात कार्यकर्त्यांना पार्टी व त्यांची संपूर्ण व्यवस्था करीत असताना मटण चिकन च्या पार्ट्या ठेवीत निवडणूक नेत्यांची न जाते मुक्या जनावरांचा जीव असे सुद्धा म्हणायला काही फरक पडणार नाही असे देखील चर्चा दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share