WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगांव परिसरात अपघाताची मालिका थांबता थांबेना..

Image

-सचिन मेश्राम

मारेगांव- यवतमाळ नगरपरिषदेने कॅरीबॅग नष्ट करण्यासाठी यवतमाळवरुन गडचांदुर अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये नेत असताना मारेगांवपासुन दोन कि.मी. अंतरावर विनायक कोटेक्सजवळ आज सांयकाळी 4:30 च्या दरम्यान, आयसर कंपनीचे मालवाहतूक ट्रक क्रमांक MH12D 6794 वाहनाचे समोरचे पट्टे तुटले.

यावेळी गाडीवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्युत खांबाला जबर धडक देवुन सदर गाडी पलटी झाली. यामध्ये यवतमाळ नगरपरिषदेचे कर्मचारी रोहित अरून इमलीकर (वय 30) रा. यवतमाळ व भारत नंदनवार (वय 40) राजु सुरज नायराण चौराशिया (वय 55) आणि वाहनचालक राजेश सोयाम रा. चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले.

जखमींना मारेगांव येथील मित्रमंडळ सदस्य इमरान शेख, मारोती परचाके, पंकज नेहारे यांनी मारेगांव ग्रामीण रूग्णालयात दाखल करून सामाजिक दायित्व दाखवले.

डॉ. उमेश नागभीडकर यांनी जखमींची उपचार प्रकिया सुरू केली आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share