WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

व्ही.व्ही. पॅट मशीनच्या वहन पेटीला सील लावण्याबाबत खुलासा....

Image

प्रतिनिधी सागर मुने, वणी

वणी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक दि.21 ऑक्टोबरला शांततेत पार पडली. मतदाना नंतर उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर 323 मतदान केंद्रावरील व्ही.व्ही. पॅट, मतपत्रिका यंत्र ( B.U.), नियंत्रण यंत्र( C.U.), सुरक्षा कक्षा मध्ये दि. 22 ऑक्टोबरला शासकीय गोदमामध्ये सुरक्षित पणे ठेवण्यात आले आहे. या प्रसंगी व्ही.व्ही.पँटच्या वहन यंत्राला (Carrying Case) ला सील नसल्याबाबतचा आक्षेप गणेश सुंकुरवार या प्रतिनिधींनी घेतला. इतर प्रतिनिधींचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नव्हता. गणेश सुंकुरवार यांनी घेतलेल्या आक्षेपाची तक्रार अपक्ष उमेदवार संजय देरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतपत्रिका यंत्र, नियंत्रण यंत्र व व्ही.व्ही. पॅट यंत्राला सील करणे बंधनकारक आहे. कोणत्याही स्थितीत या यंत्रांना मतदान केंद्राच्या पत्त्यासह सील करणे आवश्यक आहे. परंतु या यंत्राचे वहन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पेट्याना दोऱ्यानी बांधणे अपेक्षित आहे. अशा सूचना मतदान अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु या वहन पेटीला दोरीने बांधून सील करणे बंधनकारक नाही.यामुळे कोणत्याही सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत नाही . या निवडणुकीतील सर्व यंत्र हे सील बंद असून पूर्णपणे सुरक्षित आहेत. असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share