WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उतावळ्यांचे राजकारण आणि मतदारांची दिवाळी....पैसे घेऊन सुद्धा जनतेनी तेच केलं जे त्यांना पटलं?..

Image

प्रतिनिधी सुरज चाटे वणी -

वणी विधानसभा क्षेत्र अख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय असून याठिकाणी तब्बल 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. विधानसभेचे वारे वाहू लागल्यावर दोन्ही युतीमध्ये बंडखोरीचा गंध राजकीय नेत्यांत दिसून येत होता, तर काही नेते मर्जीच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवण्याकरिता धडपड करीत होते, उमेदवारी न मिळाल्याने यांचा उतावळेपणा तिथंच न थांबता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात हे उमेदवार उतरल्याने वणी विधानसभा निवडणुकीचे राजकीय समीकरण बिघडून बहुरंगी लढतीला वणी विधानसभेतील मतदारांना सामोरे जावे लागले. या काळात उमेदवार इथेच न थांबता आपण निवडून येण्याच्या स्पर्धेत कसे टिकणार ह्याकरिता साम दाम दंड भेद यांचा वापर केला निवडणुकीच्या शेवटी शेवटी तर यांचा मतमिळविण्याकरिता उतावळेपणा इतका वाढला की चक्क पैशाच्या देवाण घेवानांच्या चर्चा मतदारांशी करताना उमेदवारांचे चाहते दिसून आले.

वणी विधानसभेतील चुरशीच्या लढतीत उतावळे असलेल्या नेत्यांनी आपआपल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करीत निवडणूक लढविण्याची यशस्वी तयारी केली होती मात्र ऐन मतदानाच्या दिवशी चक्क उतावळ्यांचे राजकारण आणि मतदारांची दिवाळी असेच काहीसे होताना दिसून आले, यात अवैध व्यावसायिक व आदींनी मोठी भूमिका बजावली आहे, असे असून सुद्धा पैसे मात्र उमेदवारांकडून घेऊन जनतेने तेच केलं जे त्यांना पटलं अशी खमंग चर्चा चांगलीच जोर धरत आहे.

वणी विधानसभा असो वा नगरपरिषद ची निवडणूक की लोकसभा चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्र गाजविणारीच असते कारण इथले राजकारण काही वेगळेच असते. यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील असेच काही पाहायला मिळाले असून यात चक्क अवैध व्यावसायिक यांनी सुद्धा आपला उत्साह दाखवीत मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी करित जमेल त्या पद्धतीने आपला उमेदवार कसा निवडून येईल या दिशेने चक्र फिरवीत रात्रं दिवस एक करून शेवटी पैशाचे सुद्धा वाटपावर जोर देत कुठे 2000 एक मत तर कुठे 600, 500,1000 असे सुद्धा ऐकावयास मिळाल्याने उतावळ्यांचे राजकारण आणि मतदारांची दिवाळी झाल्याचे यात स्पष्ट दिसून येत असले तरी जनतेचा कौल मात्र काही वेगळाच दिसला. आता दिनांक 24 ची आतुरता शिगेला पोहोचली असून नेमकं यात कोण बाजीगर ठरणार हा मात्र चर्चेचा विषय आहे. कारण दिनांक 24 ला या सर्व महिन्याभराच्या कार्यक्रमांची मतमोजणी होणार असून विधानसभा कोणाच्या वाटेला येणार हे मात्र मतदार राजानी आपल्या मताने निवडले असले तरी ते खुल जा सिमसीम म्हणत निघणार आहे.

मतदान प्रक्रियेत अवैध व्यावसायिक चांगलेच मदतनीस झाले होते तर काही वेळांकरिता विविध धंदे असलेल्यानी सुद्धा याचा चुरी मुरीच्या वातावरणात आपला माणूस कसा निघणार या दृष्टिकोनातून कार्य केले आहे, तर तोंडावर आलेली दिवाळी पाहता मतदारांनी मात्र संधीच जणू सोनंच केलं असल्याची खमंग चर्चेला उधाण आले आहे.

जत्रा मैदान परिसरातील शाळे जवळ गर्दी का होते?......

निवडणुकीच्या प्रत्येक काळात नेहमीच शेवटच्या क्षणाला या मतदान केंद्रावर गर्दी कशी उफाटून येते ही वणीकरांत नेहमी चर्चेचा विषय राहाला आहे, ऐन वेळी जत्रा मैदान परिसरात स्थित असलेल्या श्री हनुमान मंदिर च्या लागतच लागून असलेल्या शाळे जवळील परिसरात नेहमीच मोठी गर्दी पहावयास मिळते जणू या परिसरातूनच उमेदवार विजयी होतो की काय? असे सुद्धा परिसरातील जनतेकडून बोलल्या जात होते. या बाबत सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share