WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कलावंतांनी केली सुरांची दिवाळी .....संस्कार भारती समितीचा उपक्रम

Image

संस्कार भारती समिती व जैताई देवस्थान तर्फे ' आली दिवाळी ' मराठी गीतांचा कार्यक्रम धनत्रयोदशी ला जैताई मंदिर येथें स्थानिक कलावंतांना घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष राजू तुरांकर, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, प्रेस वेलफेअर चे अध्यक्ष गजानन कासावसर, जैताई देवस्थान चे सचिव माधवराव सरपटवार, संस्कार भारती समितीच्या अध्यक्षा कविता चटकी मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी कृषी विद्यापीठाच्या लोक नृत्य युवा महोत्सवात तेजस चटकी व अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव नाटक विभागाच्या संघात वणीच्या टिळक महाविद्यालयातील शुभम उगले याची निवड झाली त्या करीत सत्कार करण्यात आला.

संस्कार भारती समिती नवीन कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत यावर्षी नृत्य सह मराठी गीत सादर करण्यात आले. शर्वरी व वंदना बाविस्कर, वेदिक पांडे, विद्या खंदारे, पूजा देवाळकर, डॉ अमृता अलोणे हे नवीन गायक होते तर सुप्रिया मेहता, त्रेम्बक जाधव, परिसरातील प्रसिद्ध गायक विवेक पांडे यांनी रसिकांची दाद मिळवली. काही निवडक गीतांवर नृत्य सादर करण्यात आल्याने कार्यक्रम रंगतदार झाला. राज्यस्तरीय स्पर्धेत विविध पारितोषिक प्राप्त रिद्धी राऊत ने कार्यक्रम ची सुरुवात केली तसेच न प शाळा क्र 5 च्या विद्यार्थ्यांनि गोंधळा वर नृत्य सादर करून रसिकांचे मने जिंकले. समितीच्या नृत्य प्रमुख भारती लोहबडे हिने सर्व नृत्य दिग्दर्शन केले होते.

विदर्भातील प्रसिद्ध तबला वादक अभिलाष राजूरकर, की बोर्ड वर अजित खंदारे, निखिल जीरकुंटवार, पॅड अमोल दुधलकर, ढोलक अक्षय करसे, ताल वाद्य अतुल डफ, अक्षत जाधव यांनी साथ सांगत केली.

आली दिवाळी या कार्यक्रमा साठी माजी आमदार विश्वास नांदेकर, रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी,शिवसेना शहर अध्यक्ष राजू तूरांकर, नगरसेविका संध्या अवताडे, डॉ संकेत अलोणे, संतोष दामोदर, अरविंद महालक्षमे, न प उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे संचालन समितीचे नगरमंत्री सागर मुने यांनी केले असून मंगेश गोहोकार, गणेश मत्ते, पौर्णिमा पांडे, सुनंदा गुहे,निकिता बोबडे, शंतनू मुने, अशोक सोनटक्के, अमित उपाध्ये, पूजा गढवाल, वनिता काकडे, राणी हांडे या सर्वानी कार्यक्रम यशवी करण्यासाठी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share