WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कृषी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तेजस चटकी ची निवड.... संस्कार भारती तर्फे सत्कार....

Image

प्रतिनिधी सागर मुने -

डाॅ पंजाबराव देशमुख कृषि .विद्यापीठ अकोला यांनी आयोजीत केलेल्या 2019च्या युवा महोत्सवात आंतर महाविद्यालयीन महोत्सवात तेजस चटकी व संघाने लोकनृत्य सादर केले. त्यासाठी गोल्डमेडल(कलर कोट) वसूधाताई देशमूख काॅलेज आॅफ फूड टेक्नाॅलाॅजी अमरावती ह्यांना मीळाले.

विशेष म्हणजे ह्या काॅलेजनी यंदा हॅट्रीक केलेली आहे. पूर्ण संघाची निवड झाली असून ह्यासाठी त्याला आई कविता व वडील अनिल चटकी याचे प्रॉत्साहण तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुख उमेश गजभिये, प्राचार्य वैशाली देशमूख, प्रा. राहूल पावसे व प्रा. करण देशमूख ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

लोकनृत्यात तेजस चटकी ची निवड झाली म्हणून संस्कार भारती समिती तर्फे त्याचा वणीच्या जैताई मंदिर येथे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. नवीन कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचे व कलावंत घडविण्यावचे कार्य समिती करत असते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share