WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री रंगनाथ स्वामी देवस्थान च्या वतीने ' वैकुंठ महोत्सवाचे ' आयोजन

Image

सुरज चाटे :-

वणी शहरातील प्राचीन वारसा लाभलेले श्री रंगनाथ स्वामी देवस्थान परिसरात प्रसिद्ध आहे,संपूर्ण भारतातील शेषनागावर निद्रास्थ भगवान विष्णू ची काळ्या पाषाणातील मूर्ती शहराचे वैभव आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षांला कार्तिक शुद्ध चतुर्दशी दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोज रविवार ला देवस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. मनुमहाराज तुगनायक यांच्या आयोजनात विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन वैकुंठ महोत्सव साजरा होणार आहे

श्री रंगनाथ स्वामी देवस्थान च्या वतीने आयोजित दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोज रविवारला सकाळी १०:०० वाजता अनेक दाम्पत्यानं द्वारे श्री रंगनाथ स्वामीच्या मूर्तीचा महाभिषेक,विधीवत पूजा,अर्चना,व छप्पनभोग चा प्रसाद , दुपारी १ ते ३ वाजता ब्रम्हांडणायक श्री गजानन महाराज उपासना मंडळ वणी द्वारा सामूहिक उपासना दुपारी ३ ते ६ वा महिला कीर्तनकार ह.भ.प.सौ.मृण्मयी कुळकर्णी नागपूर,यानाच्या सुमधुर वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम सायं ६ ते ७ सामूहिक श्रीसूक्त हवन श्री यज्ञ सेवा समितीच्या सौजन्याने साय ७ ते ९ सामूहिक नाम जप सोहळ यात श्री गणपतीअथर्वशीर्ष ,श्री विष्णूसहस्त्रनामावली पठन होणार रात्री ९ ते १२ सामूहिक श्री सत्यनारायण कथा,दीपोत्सव, हरीहर मिलन ब्रम्होत्सव व महाआरती वरील सर्व धार्मिक कार्यक्रम पौरोहित्य पं. श्री. गोविंद महाराज जोशी हिंगघाट व त्यांचे सहकारी करणार आहे, वैकुंठ चतुदर्शीला श्री रंगनाथ स्वामींचे दर्शन अर्थात साक्षात वैकुंठ धामाचे दर्शन मानले जाते वरील सर्व धार्मिक पूजा,विधीस,व कार्यक्रम श्री रंगनाथ स्वामी देवस्थान वणी येते आहे तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहावे छप्पनभोग प्रसाद द्यायचा असल्यास किमान २५० ग्राम मिठाई आणावी असे आवहान श्री रंगनाथ स्वामी देवस्थान वणी यांनी केले आहे,,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share