WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दीनदयाल तर्फे विधवांना सशक्त करण्याचं काम * हंसराज अहिर यांचं प्रतिपादन

Image

वणी:- दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ यवतमाळ यांच्या शेतकरी विकास प्रकल्पाच्या वतीने पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना त्यांना सशक्त करण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन त्यांना त्यांना सशक्त करण्याचं काम दीनदयाल संस्थेने केले असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे. ते दीनदयाल शेतकरी विकास प्रकल्पाद्वारे आयोजित भाऊबीजेच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्याआधी जैन समाजाचे महाश्रमनजी यांचे शिष्य अलोकमुनींजी, आनंद ऋषींच्या शिष्या चैतन्यश्रीजी मा.सा. यांनी उपस्थितांना उद्बोधन केले.

येथील गोरक्षण संस्थेत आयोजित या भाऊबीजेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी तालुका संघचालक हरिहर भागवत, गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील झाबक, तेरापंथी सभाचे अध्यक्ष सुभाष गेलडा, अशोक भंडारी, राजू मेहता, दीनदयाल संस्थेचे सचिव विजय कद्रे, नीलिमा मंत्री, मीरा फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनदयालचे गजानन परसोडकर यांनी करून या संस्थेचा कार्या विषयी माहिती दिली. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थित 70 विधवां पैकी यशस्वीपणे लघुउद्योग उभारून स्वाभिमानाने जगणाऱ्या यशस्वी महिला उद्योजक म्हणून मनिषा अमोल धुळे मूर्धोनी, सुनीता रामदास तुमराम, शारदा सुभाष गारघाटे पठारपूर, निर्मला संतोष बोढाले चिखलगाव, निर्मला अशोक कोयचाडे जळका यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर निर्मला बोढाले व निर्मला कोयचाडे या विधवांनी दीनदयाल संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या लघुउद्योगांची माहिती देऊन संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त करीत या संस्थेमुळे विधवा झाल्यानंतर देखील येथे उपस्थित भावांना ओवळण्याचं भाग्य मिळत आहे अशी भावना व्यक्त केली.

आमदार बोदकुरवार यांनी सांगितले की, या महिलांना जोडव्यवसाय उभारून त्यांना सक्षम करून संस्थेने आत्मसन्मान मिळवून दिला ही त्यांच्या दृष्टीने मोठी बाब आहे. या संघर्षरत महिलांचा पाठीशी मी ठामपणे उभा राहील असे आश्वासन दिले. सुनील झाबक यांनी उपस्थितांना गोरक्षण संस्थेची माहिती दिली. अध्यक्षीय भाषण करतांना नगरवाला यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील इयत्ता 5 वी ते 10 पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलांना शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने निःशुल्क शिक्षणाची व्यवस्था करण्याचे जाहीर केले. मागील 12 वर्षांपासून या संस्थेद्वारा असा कार्यक्रम होत आहे ही कौतुकाची बाब आहे.पण शेतकऱ्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बुजोणे यांनी केले. आभार संघाचे जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव यांनी मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share