WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अपघातात दोनवर्षीय चिमुरड्याचा मृत्यू.... लालगुडा चौपाटी परिसरातील घटना:- दिनांक 11 ला होता जन्मदिवस....

Image

प्रतिनिधी सुरज चाटे :-

वणीतील लालगुडा चौपाटी समोर दिनांक 10 ला 4.40 वाजताच्या दरम्यान दोन वर्षीय बालकाचा अपघात झाल्याची दुर्दयी घटना घडली असून त्याला तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, महत्वाचे म्हणजे दिनांक 11 ला त्याचा जन्मदिवस होता परंतु जन्मदिवसाच्या एक दिवसा अगोदरच अरहानवर काळाचा घाला झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वणीतील प्रसिद्ध दीपक चौपाटी ते लालगुडा घुगूस, चंद्रपूर जाणारा रस्ता असून या रस्त्याने वाहनांची चांगलीच रेलचेल नेहमी पहावयास मिळते. दिनांक 10 ला ईद निमित्य वणी, शास्त्री नगर येथील रहिवासी मुज्जू नामक व्यक्तीचे कुटुंब त्यांची पत्नी, व दोन मुले हे ईद च्या भेटीसाठी वागधरा येथे जात असताना दुपारी 4.40 वाजताच्या दरम्यान लालगुडा चौपाटी च्या समोर ऑटोने आपला गाव जवळ आल्याने उतरले असता बेधुंद स्थितीत येणाऱ्या अनोळखी दुचाकी चालकाने दोन वर्षीय अरहान चिमुरड्याला उडवून तो पसार झाल्याची घटना घडली आहे, जमलेल्या गर्दीतून दुचाकी स्वार हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सुद्धा बोलल्या जात होते, घटना स्थळी एकच गर्दी जमली होती दुचाकी स्वराचा पाठलाग काही युवकांनी करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षीय चिमुरडा अरहानला तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, उद्या दिनांक 11 ला त्याचा वाढदिवस होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share