WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीच्या महिलांनी चंद्रपूर येथे जिंकली स्पर्धा

Image

सागर मुने वणी

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरातील महिलांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या महिला एकांकिका स्पर्धेत ' म्याडम ' एकांकिकेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. उत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय पारितोषिक लीना गुप्ता व दिग्दर्शक द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.

दरवर्षी चंद्रपूर येथे महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या मध्ये वणीच्या कविता सातपुते यांनी आई ही खरी शिक्षिका आहे अशी भूमिका साकारली व सोनल टिकले यांनी मुलीची, सुमन ही दहावीत शिकणारी व इंग्रजी कठीण आहे आणि या मुलीची भूमिका हुबेहूब साकारली. सातव्या वर्गात शिकणारी लीना गुप्ता ही चिंगी म्हणून सहज रित्या अभिनय सादर केला व तिची मैत्रीण त्रिरत्ना मजगवळी यांचा दोघीनचा सुरेख अभिनय होता. कोणत्याही वयात माणूस शिक्षण घेऊ शकतो अशा सांगणाऱ्या सुनंदा गुहे यांची म्याडम नावाची महत्वाची भूमिका होती.

मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत 'ऑपरेशन दगड ' या एकांकिकेला तीन बक्षीस सह द्वितीय व याही वर्षी द्वितीय पारितोषिका सह तीन पारितोषिक प्राप्त झाले.

सागर मुने यांच्या मार्गदर्शनाखाली वणीतील नाट्य कलेला नवसंजीवनी प्राप्त झाली असून सागर झेप बहुद्देशीय संस्था अंतर्गत बाल नाट्य शिबिराची सुरुवात झाली तसेच राज्य नाट्य व कामगार कल्याण, नागपूर महापौर एकांकिका स्पर्धेत आशा विविध ठिकाणी वणीतील नवोदित कलावंतांना घेऊन कार्य करत आहे. भारती सरपटवार व स्वायमा शेख यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल सर्व नाट्य रसिक कौतुक करीत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share