WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मंदर येथील महिलेचा रानडुकराने पाडला फडशा.....

Image

शेतातील घटना :- गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण...

वणी तालुक्यातील मंदर येथील मीना शंकर खेडेकर नामक, अंदाजे 40 वर्षीय महिलेवर दिनांक 21 ला दुपारी 3 च्या दरम्यान रानडुकराने हमला केल्याची घटना घडली असुन त्यात महिला दगावली आहे.

मंदर येथील मीना खेडेकर ही नेहमी प्रमाणे शेतात गेली असता दिनांक 21 ला 3 वाजताच्या दरम्यान कापूस वेचणी सुरू असताना एकट्या पाहलेल्या महिलेवर रानडुकराने हमला चढवला व सदर महिलेला जागीच ठार केले असून सदर घटना दिनांक 21 ला सायंकाळच्या दरम्याम निदर्शनास आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे, सदर महिलेच्या मागे पती, 2 मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. तिच्या निधनाने सर्वत्र हळहळ होत असून आता वन विभाग यावर कोणते उपाययोजना करते हा चर्चेचा विषय असून अशा भटक्या जनावरांवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share