WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महापरीक्षा पोर्टल हटवून सरकारी नोकर भरती परीक्षा MPSC ला घेऊ द्या.

Image

प्रहार विद्यार्थी संघटनेचे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक ४ डिसेंबर २०१९ वणी- परीक्षा पोर्टल ने घातलेल्या गोंधळाने महाराष्ट्रभर विद्यार्थी आंदोलन करीत असतांना अधिकारी विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर दखल घेत नाहीत.

महापरीक्षा पोर्टल बंद करून MPSC कडे या परीक्षा घेण्याची जबाबदारी द्यावी या मागणीसाठी प्रहार विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहेत,महापरीक्षा पोर्टलमुळे होणारे विद्यार्थी नुकसान टाळण्यासाठी पोर्टल बंद करण्यात यावे, तसेच पुढील महिन्यात महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध भागातील परीक्षा (पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग) परीक्षा रद्द करून त्या परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेतल्यास परीक्षामधे पारदर्शकता येऊन विध्यार्थ्याचा सरकार वरील विश्वास वाढेल.

मागील सरकारने सरकारी पद भरती साठी कंत्राट देऊन नियुक्त केलेल्या कंपनीने परीक्षा घेताना जो गोंधळ घातला त्या मुळे सामुहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नाची पुनरावृत्ती होणे, परीक्षा केंद्रात मोबाईल व इलेक्ट्रोनिक उपकरणाचा वापर होणे, परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नीट नसणे, वेळेवर परीक्षा रद्द होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, डमी उमेदवार पकडल्या नंतर पोलीस कारवाई न होणे, इत्यादी अनेक कारणामुळे महापरीक्षा पोर्टल कारभार महाराष्ट्र भर बदनाम झाला आहे.

महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी महाराष्ट्रात जिल्हा-तालुका स्थरावर ७० पेक्षा जास्त मोर्चे विद्यार्थ्यांनी काढले आहेत, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावे या बाबत प्रहार विद्यार्थी संघटनेने माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव यांना तहसीलदार साहेब वणी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे,उपतालुकाप्रमुख साई नालमवार,सरचिटणीस अभिराज ब्राह्मणे,तालुका संघटक प्रफुल पंधरे,प्रहार सेवक गौरव ताटकोंडावार,विपुल कोकुळे,निलेश मोगरे उपस्थित होते. प्रती,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share