WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुख्यध्यापक निलंबित, दारू ढोसून कर्तव्य पार पाडण्याची नित्याचीच बाब

Image

शिक्षण गेले एकीकडे आणि त्या शिक्षकाला संभाळण्यातच विद्यार्थ्यांचा वेळ

-प्रतिनिधी

गोंडपिपरी- तालुक्यातील भंगारपेठ हे गाव तेलंगाना सिमावार्तित भागात असल्याने आजुबाजुच्या परिसरात अवैध दारुची विक्री बिनधास्त चालू असते. भंगारपेठ येथील मुख्यध्यापक रोज दारू पिउन कुठेही पडून असतो अशी तक्रार गावकऱ्यांची आहे. शिक्षण गेले एकीकडे आणि त्या शिक्षकाला संभाळण्यातच विद्यार्थ्यांचा वेळ जातो, त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसापासून तो दारू ढोसून शाळेत राडा करत असल्याची चर्चा होता आहे. अनिल बोरकुटे असे मुख्यध्यापकाचे नाव असून तो विद्यार्थ्यांचे नुकसान करीत आहेत. हा शिक्षक शाळेत यायच्या आधीच दारू पिउन निघतो आणि वाटेतच कुठेही लोळून जातो. असेच मागील आठवड्यात घडले. शाळा सुरु असताना विद्यार्थ्यासोबत खेळ खेळत असताना त्याचा तोल गेलाआणि तो तसाच पडून राहिला. दारू अति ढोसून असल्याने त्याला होश नव्हता, बराच वेळ उठवण्यात गेला असता तो उठतच नाही हे पाहून गावकऱ्यांनी शेवटी पोलिसांना बोलावलं.

या प्रकारची माहिती मुख्यकार्यकरी राहुल कर्डिले यांना देऊन तात्काळ संवर्ग अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आणि निलंबनाची कारवाही केली असून पुढील चौकशीसाठी सुचना दिल्याची सांगण्यात येते. गेल्या १५ वर्षांपासून हा शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत असून, पाच वर्षांपूर्वीसुद्धा त्याच्यावर अशीच दारू प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात आली होती. शिक्षण विभाग व शाळा समितीनेही त्याला बऱ्याचदा सुधारण्याची संधी दिली. पण मात्र, मुख्यध्यापकात कुठलाही बदल होताना दिसत नसून, शाळेच्या वेळेत दारू ढोसून कर्तव्य पार पाडण्याचा त्याचा हा नित्याचीच बाब असल्याने पुढील कारवाहीकडे गावातील लोकांचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share