WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पंतप्रधान शेतकरी सन्मानयोजनेचा निधी वंचित शेतकऱ्याच्या खातात त्वरित जमा करावा... संभाजी ब्रिगेड

Image

:पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने दोन हेक्‍टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीन टप्प्यात हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेतील काही टप्प्यात लाभ हि देण्यात आला आहे. परंतु या योजनेपासून अजूनही बहुतांश शेतकरी वंचित आहे. आधीच अस्मानी संकटाशी झुंजत असलेला शेतकऱ्याचे आर्थिक बजेट डबगाई आलेले असल्यामुळे. सबंधीत अधिकाऱ्यानी या योजने संदर्भातील शेतकऱ्याच्या त्रुटीचा निपटारा करून लवकरात लवकर, तो निधी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडने तहसीलदार यांंच्याकडे निवेदनात केली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष देव येवले , शंकर झाडे , संजय आसुटकार, दिवाकर हिरादेवे, मुर्लीधर बेलेकर, अक्षय गडकर, सत्यवान चिंचुलकार, सुरेश वासाडे, आनंदराव ढुमने व अन्य सहकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share